Monsoon Recipe : पावसाळ्यात टेस्टी खाद्यपदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. या हंगामात, लोकांना विशेषतः मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थांचा आनंद घ्यायचा असतो. पावसाळ्यात चहासोबत या खास पाककृतींचा आस्वाद घेऊ शकता. तर मग वाट कशाची पाहताय, या पावसाळ्यात ही खास रेसिपी घरीच करून पहा.
पावसाळ्यात लोक अनेक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात. जेव्हा कधी पाऊस पडतो तेव्हा घरात चहासोबत काहीतरी तळलेले असावे अशी एकच मागणी असते. एक कप गरमागरम चहा, तुमची आवडती गाणी, पावसाचे थेंब, थंड वाऱ्याची झुळूक आणि चहासोबत काही स्वादिष्ट खाद्य पदार्थ यामुळे पावसाळ्याची मजा द्विगुणित होते. पावसाळ्यात चहासोबत मसालेदार नाश्ता खाण्याची मजा काही औरच असते. हा पावसाळा आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे पर्याय सांगणार आहोत.
कुरकुरीत भजे
कुरकुरीत भजे हे चहासोबतचे सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे. पावसाळ्यात या टेस्टी स्नॅकचा आनंद प्रत्येकाला घ्यायचा असतो. या दिवसात भज्यांसाठी मागणी वाढलेली असते. खाद्य पदार्थांच्या दुकानातही गर्दी झालेली दिसते.
वडा पाव
पावसाळ्यात चविष्ट फास्ट फूडचा विचार केला तर वडापाव पेक्षा चांगले काही मिळत नाही हे कोणीही नाकारू शकत नाही. उकडलेले बटाटे मसाल्यांनी मॅश करून गोळे बनवले जातात, बेसनाच्या पिठात बुडवून तळलेले असतात. पाव किंवा ब्रेडमध्ये चटणीसह सँडविच म्हणून सर्व्ह केले जाते, जे पावसाळ्यात आणखी छान लागते.
मक्याचे कणीस
मान्सून आणि मक्याचे कणीस या दोघांचे मिश्रण, पावसाळ्यात आनंद देतात. भाजलेला मका किंचित धुरकट रंग आणि सुगंधाने त्याची चव वाढते. कॉर्नवर एक जाड पेस्ट टाकली जाते, ज्यामध्ये तिखट, चाट मसाला, वितळलेले लोणी आणि थोडासा लिंबाचा रस असतो. या पावसाळ्यात हा खाद्यपदार्थ ट्राय करायला काही हरकत नाही.
इडली
हा पारंपारिक दक्षिण भारतीय पदार्थ पावसाळ्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. गरमागरम आणि मसालेदार सांबार सोबत सर्व्ह केलेली इडली स्वादिष्ट लागते.