अहमदनगर : देशात आता पोहे सर्वत्र पोहे पसंत केले जातात. पोह्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. बिहार-झारखंडमध्ये पोहे भाजून संध्याकाळचा नाश्ता म्हणून खाल्ले जातात. आज आम्ही तुम्हाला पोह्यांच्या एका नवीन डिश ‘पोहा कचोरी’ च्या रेसिपीबद्दल सांगणार आहोत.
ही डिश सकाळच्या नाश्त्यात बनवता येते. तुम्हाला हवं असेल तर संध्याकाळी चहाबरोबरही तुम्ही हे तयार करू शकता. या कचोरीत बटाट्याचे सारण केले जात असल्याने मुलांना हा पदार्थ आवडेल. चला जाणून घेऊ या ही खास डिश कशी तयार करायची ते.
साहित्य – पोहे दीड वाटी, बटाटे 3 उकडलेले, हिरवी मिरची 3, कोथिंबीर अर्धा कप, आमचूर पावडर 1 चमचा, हिंग 2 चिमूटभर, धने पावडर 2 चमचे, लाल तिखट अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, कांदा 1, रिफाइंड तेल, मीठ चवीनुसार.
रेसिपी
पोहे 10-15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. पोहे चांगले शोषून घेईल इतके पाणी टाका. उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, आमचूर पावडर, धने, लाल तिखट, ओवा, कांदा आणि चवीनुसार मीठ घालून मिसळून घ्या. भिजलेल्या पोह्यात थोडे मीठ टाकून चांगले मळून घ्या. मळलेले पोहे दहा मिनिटे झाकून ठेवा. दहा मिनिटांनंतर पीठ घ्या आणि त्यात बटाट्याचे मिश्रण भरून घ्या. पीठ चांगले बंद करा. त्यानंतर तेलात या कचोऱ्या मंद आचेवर तळून घ्या. कचोरी दोन्ही बाजूंनी लाल झाल्यानंतर काढून घ्या. पोहे कचोरी चहा किंवा चिंचेच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
Recipe : नाश्त्यासाठी तयार करा मूग डाळ कचोरी; ही आहे एकदम सोपी रेसिपी..