World Poha Day 2023 : पोहे खाणारे तुम्हाला भारतात सर्वत्र (World Poha Day) आढळतील. ही एक अशी डिश आहे जी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जाते. तुम्ही ते पारंपारिकपणे शेंगदाणे, बटाटे आणि कढीपत्त्यांसह तयार करू शकता. संध्याकाळच्या दह्यासोबत नाश्ता म्हणून, पोहे हा लाखो भारतीयांचा आवडता खाद्यपदार्थ आहे.
तसे पाहिले तर पोहे ही महाराष्ट्राची देणगी आहे. राज्यात कांदा पोहे अतिशय लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातूनच हा खाद्यपदार्थ देशभरात पोहोचला. आता तर देश विदेशातील लोकही अत्यंत आवडीने पोहे खातात.
देशभरात अनेक प्रकारचे पोहे खायला मिळतील. उदाहरणार्थ, पश्चिम बंगालमध्ये ते ‘चिरेर पोलाओ’ म्हणून ओळखले जाते, तर तामिळनाडूमध्ये ‘अवल’ खूप लोकप्रिय आहे. कन्नडमध्ये ‘अवालक्की’ आणि ओडिशात ‘चूडा’ म्हणतात.
या डिशच्या सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ७ जून रोजी जागतिक पोहा दिवस (World Poha Day) साजरा केला जातो.
पोहे कुठून आले?
पोहे बनवण्याचे श्रेय कुणा एका व्यक्तीला देता येणार नाही पण, या लोकप्रिय खाद्यपदार्थाचे संदर्भ तुम्हाला महाभारतातही सापडतील. होय या महाकाव्यात, भगवान श्रीकृष्णाचा बालपणीचा मित्र, सुदामा त्याला अवलाची वाटी (पोह्याचे दुसरे नाव) देतो.
नाश्त्यासाठी योग्य मानले जाणारे पोहे मध्य प्रदेशात प्रसिद्ध झाले जेव्हा होळकर आणि सिंधिया यांनी इंदूर काबीज केले. त्यांच्या राजवटीत पोह्यांना लोकप्रियता मिळाली आणि ते घराघरात पसंत केले जाऊ लागले.
पोहे चवीला तर उत्तमच, पण पौष्टिकतेनेही परिपूर्ण आहेत. आपल्या सकाळची सुरुवात एका स्वादिष्ट नाश्त्याने करायला आपल्या सर्वांना आवडते. तथापि, जर तुम्ही मधुमेहासारख्या आजाराने ग्रस्त असाल तर तुमच्याकडे कमी पर्याय आहेत. तळलेले अन्न तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवते. मधुमेही रुग्ण नाश्त्यात पोहे खाऊ शकतात. पोहे फायबरने भरलेले असतात, जे पचन सुधारते आणि रक्तातील साखर वाढवत नाही. तसेच, यामुळे तुमचे पोट भरते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता.
ज्यांना लोहाची (आयरन) कमतरता किंवा अशक्तपणाचा त्रास आहे अशा लोकांनी नाश्त्यात पोहे खावेत. तांदळाला लोखंडी रोलर्सच्या साहाय्याने सपाट केले जातो आणि या प्रक्रियेत काही लोह पोह्यांमध्येही जाते.
एक वाटी पोह्यात 250 ग्रॅम कॅलरीज असतात, जे डाएट करतात त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला वजन वाढवायचे नसेल तर त्यात भाजलेले शेंगादाणे किंवा नमकीनचे प्रमाण लक्षात घ्या.