Work From Home Side Effects : कोरोना महामारीनंतर आपल्या जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. वैयक्तिक आयुष्यासोबतच या महामारीमुळे लोकांच्या व्यावसायिक जीवनातही अनेक बदल झाले आहेत. कोरोना महामारीपासून, घरून काम करण्याची (Work From Home) पद्धत जगभरात विशेषतः भारतात खूप लोकप्रिय झाली होती. आजही अनेक कार्यालये आणि कंपन्या वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रीड मॉडेलवर काम करत आहेत.
मात्र, सतत घरून काम केल्यामुळे आपल्या आरोग्याचे अनेक नुकसान होत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. घरातून काम केल्यामुळे लोक सतत अनेक तास एकाच ठिकाणी बसतात, ज्यामुळे हाडे, स्नायू आणि सांधे यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल, जे सतत घरून काम करत असतील तर या गोष्टी कायमच्य लक्षात ठेवा.
शारीरिक हालचालींचा अभाव
घरातून काम केल्यामुळे लोक डेस्क किंवा सोफ्यावर बराच वेळ बसतात. ज्यामुळे अनेकदा शारीरिक हालचालींचा अभाव असतो. अशा प्रकारे शारीरिक हालचालींच्या अभावामुळे कमकुवत हाडांसह विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
सूर्यप्रकाशाचा अभाव
घरातून काम केल्यामुळे लोक बराच वेळ घरातच राहतात. अशा परिस्थितीत ते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ शकत नाहीत, जे व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
खराब एर्गोनॉमिक्स
काही लोकांकडे घरून काम करण्यासाठी योग्य ऑफिस सेटअप नाही. ज्यामुळे ते खराब आणि चुकीच्या स्थितीत बसतात. त्यामुळे हाडे आणि स्नायूंवर दबाव येतो.
पाठीचा कणा प्रभावित होतो
चुकीची बसण्याची स्थिती, विशेषत: खुर्चीवर बसल्यावर मणक्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि इंटरवर्टेब्रल डिस्कवर दबाव वाढू शकतो. कालांतराने यामुळे पाठदुखी आणि पाठीच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
हाडांची घनता कमी होणे
बराच वेळ घरून काम केल्यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. या प्रकरणात हाडांची घनता कमी होऊ शकते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो.
टीप – लेखात नमूद केलेली माहिती आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.