अहमदनगर : सिमला मिरचीपासून अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ बनवता येतात. अनेक भाज्यांमध्ये सुद्धा सिमला मिरचीचा वापर केला जातो. ज्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक खास रेसिपी सांगणार आहोत. सिमला मिरची बटाट्याची चवदार भाजी कशी तयार करायची याची माहिती देणार आहोत. ही भाजी तयार करायला खूप सोपी आहे आणि कमी वेळात बनवता येते.
साहित्य- बटाटा, शिमला मिरची, हिरवी मिरची, कांदा, दालचिनी, तमालपत्र, जिरे, मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट, कसुरी मेथी, दही, टोमॅटो, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार तेल.
रेसिपी
प्रथम बटाटा, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची पाण्याने धुऊन घ्या. नंतर या वस्तू बारीक करुन घ्या. त्यानंतर कढईत तेल गरम करा. बटाटे गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. आता बटाटे एका प्लेटमध्ये काढून टोमॅटो प्युरी तयार करा. आता या तेलात जिरे, तमालपत्र आणि दालचिनी टाकून चांगले तडतडून घ्या.
कांदा तेलात टाकून चांगला परतून घ्या, आता टोमॅटोची प्युरी टाकून चांगली परतून घ्या, नंतर अद्रक-लसूण पेस्ट टाकून तेही परतून घ्या. शिजल्यानंतर त्यात मीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड टाकून 5 मिनिटे परतून घ्या. एक उकळी आली की त्यात दही टाका. चांगले शिजू द्या. मसाल्यात तेल दिसू लागल्यावर त्यात सिमला मिरची आणि बटाटे टाकून काही वेळ झाकून ठेवा. 7 ते 10 मिनिटांनी झाकण काढून त्यात गरम मसाला टाका. अशा पद्धतीने सिमला मिरची बटाट्याची भाजी तयार आहे, कोथिंबीरीने टाकून नंतर सर्व्ह करा.
Todays Recipe : उन्हाळ्यात वेगळ्या पद्धतीने तयार करा टेस्टी भेंडी.. जाणून घ्या, सोपी रेसिपी
Todays Recipe : घरच्या घरीच तयार करा टेस्टी पालक खिचडी.. आरोग्यासाठीही आहे फायदेशीर..