नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ.. अर्थात ‘एलआयसी’ (LIC) च्या ‘आयपीओ’ (IPO) बद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. देशातील या सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीचा ‘आयपीओ’ येत्या 4 मे रोजी येणार असून, तो 9 मे रोजी बंद होणार आहे. या काळात किरकोळ गुंतवणूकदारांना त्यात सहभागी होता येणार आहे. तसेच अँकर गुंतवणूकदारांसाठी 2 मे रोजीच हा मेगा ‘आयपीओ’ खुला होणार असल्याचे सांगण्यात आले.

‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’साठी प्राईस बँड 902 रुपये ते 949 रुपये निश्चित करण्यात आली आहे. एक लॉट 15 शेअर्सचा असेल. आज (बुधवारी) दुपारी पत्रकार परिषदेत समभाग विक्रीबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

किती सूट मिळणार..?
दरम्यान, ‘एलआयसी आयपीओ’साठी अर्ज करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदार व एलआयसी कर्मचाऱ्यांना प्रति शेअरमागे 45 रुपयांची सूट मिळणार आहे. तर, पॉलिसीधारकांना प्रति शेअरमागे 60 रुपये सूट मिळणार आहे.. संबंधित हिस्सेदार व पॉलिसीधारकांसाठी काही शेअर्स राखीव ठेवल्यानंतर उरलेल्या समभागांपैकी 50 टक्के पात्र संस्था, 35 टक्के समभाग रिटेल गुंतवणूकदार व 15 टक्के समभाग बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असतील.

आयपीओचा इश्यू साईज 21,000 कोटी रुपये असून, या ‘आयपीओ’द्वारे सुमारे 22.14 कोटी शेअर्स विकले जाणार आहेत. याआधी सरकार एलआयसीमधील 5 टक्के हिस्सा विकणार होती, पण आता सरकारने फक्त 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

‘एलआयसी आयपीओ’ची चर्चा सुरू झाली, तेव्हा सरकारने त्याचं मूल्यांकन 17 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता, पण आता आयपीओ हिट करण्यासाठी एलआयसीचे मूल्यांकन केवळ 6 लाख कोटी रुपये करण्यात आलं आहे. सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या लक्ष्याचा तो एक भाग आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65 हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. खरं तर ‘एलआयसी आयपीओ’ 31 मार्च 2022 पर्यंत येणार होता, परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.

ठाकरे सरकारमागे साडेसाती.. आणखी एका मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश..
निवडणुकीपूर्वी काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये: पक्षात केला मोठा बदल; जाणुन घ्या संपूर्ण डिटेल्स

Share.

Leave A Reply

Exit mobile version