LIC schemes : LIC ही जुनी विमा कंपनी आहे, या कंपनीच्या अनेक योजना आहेत. ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकतो. कंपनी अशा योजना ऑफर करते ज्यात गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळतो. कंपनीची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला 110 टक्के परतावा मिळेल.
LIC ची भाग्य लक्ष्मी योजना ही एक सूक्ष्म विमा योजना असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचे सुरक्षित भविष्य लक्षात घेऊन तयार केलेली ही योजना आहे. यावर जीएसटी लागू नाही. या योजनेमध्ये मुदत योजना तसेच परतावा प्रीमियम योजना आहे. या योजनेत, तुम्हाला भरलेल्या प्रीमियमवर केवळ मुदतीचा विमा मिळत नाही, तुम्हाला मुदतपूर्तीवर ठेवीपैकी 110 टक्के परत मिळतो.
ही योजना गुंतवणूक, बचत आणि विमा पॉलिसी म्हणून काम करते. पॉलिसी पूर्ण झाल्यावर, विमा धारकास जमा केलेल्या प्रीमियमच्या एकूण 110 टक्के रक्कम देते. समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या अवलंबितांना मृत्यू लाभ दिला जातो.
जाणून घ्या भाग्य लक्ष्मी योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेत, प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक किंवा एकरकमी भरता येतो.
- या योजनेची किमान विमा रक्कम 20,000 रुपये इतकी आहे.
- या योजनेअंतर्गत कमाल विम्याची रक्कम 50,000 रुपये इतकी आहे.
- भाग्य लक्ष्मी योजनेत, वार्षिक मोड प्रीमियममध्ये 2 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.
- अर्धवार्षिक मोडवर पेमेंट केले तर प्रीमियमवर 1% सवलत देण्यात येते.
- LIC भाग्य लक्ष्मी पॉलिसीचा कालावधी किमान 7 वर्षे आणि कमाल 15 वर्षे आहे.
- किमान प्रीमियम भरण्याची मुदत 5 वर्ष आणि कमाल मुदत 13 वर्षे आहे.
- LIC भाग्यलक्ष्मी योजना घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्षे इतकी आहे.