LIC Scheme । अरे व्वा! 3 हजारांच्या प्रीमियमवर मुलींना मिळेल 22 लाखांचा परतावा, कसं ते जाणून घ्या

LIC Scheme । सरकारने मुलींसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा फायदा लाखो मुलींना होत आहे. LIC ची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला 3 हजारांच्या प्रीमियमवर 22 लाखांचा परतावा मिळेल. या योजनेचे नाव एलआयसी कन्यादान योजना असे आहे.

एलआयसी कन्यादान योजना

एलआयसी कन्यादान पॉलिसी हा मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगला पर्याय असून या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमच्या मुलीसाठी 22.5 लाख रुपयांचा निधी जमा करता येईल. कर सवलती, कर्ज सुविधा आदी सुविधा या योजनेत मिळतील. जर तुमच्या मुलीचे वय 1 वर्ष ते 10 वर्षांच्या दरम्यान असल्यास तुम्ही या योजनेत गुंतवणूक करता येईल.

हे लक्षात घ्या की एलआयसीची कन्यादान पॉलिसी ही मुदत विमा आहे. या पॉलिसीचा कालावधी 13-25 वर्षांचा असून यात तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक यापैकी प्रीमियम पेमेंटसाठी कोणताही एक पर्याय निवडता येईल. तसेच मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला विम्याची रक्कम + बोनस + अंतिम बोनससह एकूण रक्कम मिळते. गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलीच्या वडिलांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असावे.

जाणून घ्या योजनेचे फायदे

  • गुंतवणूकदाराला पॉलिसी घेतल्याच्या तिसऱ्या वर्षीच कर्जाची सुविधा मिळते.
  • तसेच पॉलिसीच्या दोन वर्षानंतर, गुंतवणूकदाराला ते सरेंडर करण्याचा पर्याय मिळतो.
  • या पॉलिसीमध्ये वाढीव कालावधीत प्रीमियम भरण्याचा पर्याय असून यात तुम्ही कोणत्याही महिन्यात प्रीमियम भरला नाही, तर
  • तुम्ही विलंब शुल्काशिवाय पुढील 30 दिवसांत प्रीमियम भरू शकता.
  • या पॉलिसीमध्ये प्रीमियम भरले तर 80C अंतर्गत कपातीचा लाभ उपलब्ध आहे.
  • कलम 10D अंतर्गत परिपक्वता रकमेवर कर लाभ मिळतो.

असा मिळेल लाखोंचा फायदा

तुम्ही एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक 41,367 रुपये गुंतवावे लागतील. याचा अर्थ प्रीमियम दरमहा सुमारे 3,447 रुपये असणार आहे. तर 25 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी, तुम्हाला फक्त 22 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. आता मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सुमारे 22.5 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.

Leave a Comment