LIC Saral Pension Yojana : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC नेहमीच ग्राहकांच्या आर्थिक फायद्यासाठी पॉलिसी सादर करत असते ज्याच्या फायदा घेत सध्या देशातील लाखो लोक दरमहा हजारो लाखो रुपयांची कमाई करत आहे.
यातच जर तुम्ही देखील एलआयसी मध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला एका मस्त एलआयसीच्या पॉलिसीबद्दल माहिती देणार आहोत. या पॉलिसीमध्ये तुम्ही काही न करता दरमहा हजारो रुपये सहज कमवू शकतात चला मग जाणून घेऊया या पॉलिसी बद्दल सविस्तर माहिती.
एलआयसीच्या या पॉलिसी चे नाव LIC Saral Pension Yojana आहे. या योजनेमध्ये तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शन मिळते.
LIC Saral Pension Yojana ची वैशिष्ट्ये
जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर 40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. ही पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शन मिळू लागते. ज्यामध्ये पॉलिसीमध्ये प्रीमियम एकदाच जमा केला जातो. दुसरीकडे, कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, व्यक्तीला जमा केलेल्या रकमेवर पैसे परत मिळतात. तसेच पॉलिसीधारक 6 महिन्यांनंतर कधीही पॉलिसी सरेंडर करू शकतो
पॉलिसी घेतल्यानंतर, जोपर्यंत पॉलिसीधारक जिवंत आहे, तोपर्यंत त्याला पेन्शनचा लाभ मिळत राहतो, तर मृत्यू झाल्यास, पैसे नॉमिनीला परत केले जातात. दुसरीकडे, संयुक्त खात्यात, पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत त्याला पेन्शन मिळते. त्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला पेन्शन मिळत राहते. जर दोघांचा मृत्यू झाला तर जमा केलेली रक्कम नॉमिनीला दिली जाते.
पेन्शनसाठी उत्तम पर्याय
सरल पेन्शन योजनेअंतर्गत, तुम्ही किमान मासिक पेन्शन रु 1000 मिळवू शकता. त्याच वेळी, गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या पॉलिसीमध्ये तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियमचा पर्याय निवडू शकता.
उदाहरणार्थ, जर 42 वर्षांच्या व्यक्तीने 30 लाख रुपयांची वार्षिकी घेतली तर त्याला 12,388 रुपये किंवा सुमारे 12,400 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.