LIC Policy : LIC ची सर्वात भारी योजना, कोणत्याही कष्टाशिवाय महिन्याला मिळतील 20 हजार रुपये; आत्ताच करा गुंतवणूक

LIC Policy : अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये कमी वेळेत जास्त परतावा मिळतो तर काही योजनांमध्ये कमी परतावा मिळतो. LIC गुंतवणूकदारांसाठी अनेक योजना ऑफर करत असते. यातील काही योजना बऱ्याच जणांना माहिती नसतात. LIC ची अशी एक योजना आहे ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळेल.

जर तुम्ही LIC ची अशी योजना शोधत असाल, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळेल. तर LIC च्या या योजनेचे नाव LIC जीवन अक्षय पॉलिसी असून तुम्ही एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करून तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. तुम्ही जर या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळेल. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

तुम्हाला एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये एकदा गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ घेता येईल. अशा वेळी तुम्हाला एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारचा मासिक प्रीमियम भरण्याची गरज नाही.

हे लक्षात घ्या की एलआयसीची ही योजना तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. 30 ते 85 वर्षे वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये 40,72,000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर अशा परिस्थितीत तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा सुमारे 20 हजार रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

विशेष म्हणजे एलआयसीची ही योजना एकल आणि संयुक्त विमा पॉलिसींसाठी दहा वर्षांसाठी उपलब्ध असून एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला खूप फायदेही मिळतात.

Leave a Comment