LIC Kanyadaan Policy : आनंदाची बातमी! मुलीच्या लग्नात मिळणार 27 लाख रुपये, जाणून घ्या किती करावी लागेल गुंतवणूक

LIC Kanyadaan Policy : जर तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करत असाल तर तुमच्यासाठी देशाची सर्वात मोठी विमा कंपनी LIC एक जबरदस्त योजना सुरु केली आहे.

या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल 27 लाख रुपये जमा करू शकता. याच बरोबर तुम्हाला या योजनेत इतर काही फायदे देखील देण्यात येत आहे. मग चला जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

या योजनेचे नाव LIC कन्यादान पॉलिसी आहे. या अंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी लाखो रुपयांची मदत दिली जाते. तुम्हाला या योजनेत दररोज 121 रुपये गुंतवा लागणार आहे आणि तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 27 लाख रुपये मिळतील.

गाझामध्ये पुन्हा येणार शांतता? रमजानमध्ये युद्धबंदीचा ठराव मंजूर! वाचा सविस्तर

LIC ची कन्यादान पॉलिसी काय आहे?

LIC कन्यादान पॉलिसीच्या लाभार्थीच्या वडिलांचे वय किमान 30 वर्षे आणि मुलीचे वय किमान एक वर्ष असावे. तुम्ही ही पॉलिसी 13 ते 25 वर्षांसाठी घेऊ शकता. या योजनेत तुम्हाला दररोज 121 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच तुम्हाला एका महिन्यात एकूण 3,600 रुपये जमा करावे लागतील.

पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला 27 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल.  तुम्ही दररोज 75 रुपये जमा केले तरीही तुम्हाला 25 वर्षांनंतर 14 लाख रुपये मिळतील.

कर सवलतीचा लाभ

LIC कन्यादान पॉलिसी आयकर कायदा 1961 च्या कलम 80C च्या कक्षेत येते, त्यामुळे प्रीमियमवर भरलेल्या करावरही सूट उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सूट मिळू शकते.

सावधान, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, विदर्भात गारपीटीची शक्यता; जाणून घ्या ताजे अपडेट

एलआयसी कन्यादान पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये तुमचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो समाविष्ट आहे. याशिवाय स्वाक्षरी केलेला अर्ज आणि मुलीचा जन्म दाखलाही द्यावा लागणार आहे. तुम्ही चेक आणि कॅश या दोन्ही पद्धतीने प्रीमियम भरू शकता.

पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास अटी

ही पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना प्रीमियम भरावा लागणार नाही. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 10 लाख रुपये आणि सामान्य परिस्थितीत मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाख रुपये मिळतील. याशिवाय, 25 वर्षे पूर्ण झाल्यावर नॉमिनीला 27 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम मिळेल.

Leave a Comment