पुणे : जगभरातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्माता कंपनी LG ने मंगळवारी जगातील पहिला 12 इंचाचा हाय-रिझोल्यूशन स्ट्रेचेबल डिस्प्ले लाँच केला आहे. नवीन डिस्प्ले फ्री-फॉर्म तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचे कंपनीचे म्हणणे असून हा डिस्प्ले कोणत्याही नुकसानाशिवाय वाढवता आणि फोल्ड केला जाऊ शकतो. हा नवीन डिस्प्ले तब्बल 20 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो आणि त्याचे रिझोल्यूशन 100ppi आहे. RGB असलेला हा डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये उच्च लवचिकता आणि टिकाऊपणा यासारखी वैशिष्ट्ये असून नवीन LG डिस्प्ले विशेष सिलिकॉनपासून बनवलेल्या अत्यंत लवचिक फिल्म-प्रकारच्या सब्सट्रेटवर तयार केला आहे.
हा डिस्प्ले कॉन्टॅक्ट लेन्समध्ये वापरला जातो. कंपनीचे म्हणणे आहे की नवीन 12-इंच डिस्प्लेमध्ये रबर बँडसारखी लवचिकता असून 14 इंचांपर्यंत वाढवता येऊ शकते. त्यांनी डिस्प्लेचे फ्री-फॉर्म स्वरूप विद्यमान फोल्डेबल आणि रोल करण्यायोग्य तंत्रज्ञानाच्या पलीकडे अपडेट केले आहे. स्ट्रेचेबल डिस्प्ले हा उच्च टिकाऊपणा आणि रिझोल्यूशनसाठी 40μm पेक्षा कमी पिक्सेल पिचसह मायक्रो-एलईडी प्रकाश स्रोत वापरणारा आहे. एकूणच हा बाजारात क्रांती करणारा घटक ठरणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार LG डिस्प्लेचा हा स्ट्रेचेबल डिस्प्ले R&D प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आला आहे. या कंपनीची 2020 मध्ये दक्षिण कोरियाच्या व्यापार, उद्योग आणि ऊर्जा मंत्रालयाने (MOTIE) नेतृत्व करण्यासाठी निवड केली होती. कंपनी तेव्हापासून दक्षिण कोरियाच्या औद्योगिक-शैक्षणिक क्षेत्रातील 20 संस्थांसोबत काम करत आहे. स्ट्रेचेबल डिस्प्ले हा सडपातळ आहे. त्याची रचना हलकी आहे, आणि त्याच्या तंत्रज्ञानामुळे ते त्वचा, कपडे, फर्निचर, ऑटोमोबाईल्स आणि विमाने यांसारख्या वक्र पृष्ठभागांवर सहजपणे जोडले जाऊ शकते.
Bank Complaint to RBI: अशी करा बँकेची तक्रार; लगोलग होणार अधिकाऱ्यांवर कारवाई