चंडीगड : काही दिवसांपूर्वी देशात लिंबाचा भाव (Lemon Price increased) 200 रुपये किलोच्या पुढे गेला होता. अशावेळी लिंबूंचे भाव (Limbu / Nimbu rate) गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे अवघड झाले होते. अनेक ठिकाणांहून लिंबू चोरीच्या घटनाही समोर आल्या होत्या, त्या खूपच धक्कादायक होत्या. पण याच दरम्यान पंजाबमधील कपूरथला मॉडर्न जेलमधून लिंबू घोटाळा (Lemon Scam) उघडकीस आला आहे. ज्यामध्ये तुरुंग अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
- Agriculture Insurance scam: पिकविमा योजनेत महाघोटाळा..! पहा नेमका काय प्रकार केलाय कागदपत्रात
- Bitcoin scam मुळे पोलीसही गांगरले..! सरकारलाही ‘त्याने’ घातलाय मोठा डल्ला..!
- PM Modi Tour on France: आणि भारताला बसला मोठा झटका; पहा काय केलेय फ्रांसच्या कंपनीने
वास्तविक, हे प्रकरण 50 किलो लिंबू खरेदीशी संबंधित आहे. एनडीटीव्हीच्या (NDTV News) वृत्तानुसार तुरुंग अधिकाऱ्याने 50 किलो लिंबू खरेदी केल्याचे दाखवले होते. मात्र तुरुंगातील कैद्यांना जेवणासाठी लिंबू दिले जात नव्हते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली असता या घोटाळ्यावर पडदा पडला. कारागृह अधिकाऱ्याने रेशनच्या नोंदीमध्ये 50 किलो लिंबू खरेदी केल्याचे तपासात उघड झाले, मात्र जेवणात लिंबू मिळाले नसल्याचे कैद्यांनी सांगितले. या घोटाळ्याची माहिती एका तपासणी पथकाने कारागृहाला भेट दिली तेव्हा समोर आली. या भेटीदरम्यान कारागृहातील कैद्यांनी अधिकाऱ्यांना रेशनमध्ये लिंबू मिळत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. कैद्यांच्या या तक्रारीनंतर पंजाबचे तुरुंग, खाणकाम आणि पर्यटन मंत्री हरजोतसिंग बैंस यांनी तुरुंग अधीक्षकांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते. तपासात हा घोटाळा समोर आला असून त्यानंतर तुरुंग अधिकारी गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले होते.
Political News: कॉंग्रेसने केलाय सर्व्हे; पहा त्यात नेमके किती आमदार झालेत नापास https://t.co/Uah2E4Aq2l
— Krushirang (@krushirang) May 7, 2022
तुरुंगातून तक्रार आल्यानंतर एडीजीपी (कारागृह) वीरेंद्र कुमार यांनी 1 मे रोजी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानक तपासणीसाठी तुरुंगात पाठवले होते. कैद्यांना दिले जाणारे जेवण निकृष्ट आणि अपुरे असल्याचे पथकाला आढळून आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुरुंगात भाजलेल्या प्रत्येक चपातीचे वजन 50 ग्रॅमपेक्षा कमी होते, जे पिठाच्या पुरवठ्यातही काहीतरी गडबड असल्याचे दर्शवते. याशिवाय तपासात भाजी खरेदीतही अनियमितता आढळून आली आहे. (Kapurthala Jail Officer din dnot give proper food and lemon)
Government Subsidy Scheme: सोलर पंपासाठी मिळतेय 60 % अनुदान; पहा नेमके काय करावे लागेल योजनेसाठी https://t.co/oqkQCpU4Hb
— Krushirang (@krushirang) May 7, 2022