Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

News Maharashtra today: ‘त्या’ प्रकरणी फडणविसांची फाइल क्लोज; मिळणार क्लीनचिट..!

News Maharashtra today: पुणे (Pune): युती सरकारच्या (BJP Shivsena government) काळात देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar) या योजनेकडे पाहिले जात होते. या योजनेने अनेक गावातील दुष्काळ संपला असा दावा केला जात होता. मात्र, महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची याच प्रकरणात चौकशी लावण्याचा प्रयत्न केला. पण आता राज्यात पुन्हा भाजप सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील चौकशी (corruption enquiry) बंद केल्या जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

पुणे दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या. त्या सर्व कामांची चौकशी बंद केली आहे. पण जिथं काही चुकीचे झाले आहे, त्या चौकशा सुरू राहतील.” विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीच्याबाबत भाष्य केले होते. त्याला अनुसरून फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. अजित पवार यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले,” यांच्याकडे सध्या खूप वेळ असून ते आरोप करतच राहणार आहेत. मात्र, मला उत्तर द्यायला वेळ नाही,’’

Loading...
Advertisement

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुण्यामध्ये भाजपवर टीका केली. त्यावर फडणवीस यांनी नाना पटोले यांना दिवसातून एक दोन वेळा झटके येतात, त्यामुळे हे काही तरी बोलतात, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घ्यायचे नसते. नांदेड (Nanded) येथील कार्यक्रमात मला धक्काबुक्की झालेली नाही, तसेच तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आलेला नाही. विनाकारण अशा प्रकारच्या अफवा पसरवून गैरसमज वाढवले जात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. पुणे तळगाव येथे होणारा वेंदाता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला (Gujarat) हलविल्याबद्दल फडणवीस म्हणाले, यासंदर्भात मी काल बोललो आहे. तसेच लोकांना काहीही माहीत नसत, त्यामुळे जे विरोधक माहिती नसताना बोलत असतील तर त्यांच्या प्रश्‍नाला मी उत्तर देणार नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply