Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

News Maharashtra today: पवारांनी सांगितले ‘ते’ गुपित; पहा खासदार मुलीबाबत नेमके काय म्हटलेय

News Maharashtra today: पुणे (Pune): ‘सुप्रिया लगेच राजकारणात येणार नाही. तिची इच्छाही नाही असे मी एका मुलाखतीमध्ये बोललो होतो. पण माज्या मुलीने माझा अंदाज खोटा ठरवला. एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात, तसेच सध्या सुप्रिया सांगेल ते ऐकावे लागते’, अशी शब्दात खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या राजकारणातील एंट्रीबद्दल राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी भाष्य केले.

Advertisement

पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या (Pune Doctor’s Association) वतीने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ‘सिंगल डॉटर फॅमिली’ उपक्रमांतर्गत मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. मुख्य विश्वस्त डॉ. सुनील जगताप आणि अध्यक्ष डॉ. नीलेश जगताप या वेळी उपस्थित होते. निवडणुकीसाठी प्रचारादरम्यान ‘एकच मुलगी, बरं वाईट झालं तर चितेला अग्नी कोण देणार?’ असे प्रश्न ग्रामीण भागातील ज्येष्ठांनी विचारले. पण, ‘जिवंत असताना मुलीशी नीट वागण्याची चिंता करायची की मेल्यावर चितेला अग्नी कोण देणार याची चिंता करायची?’, आरक्षण दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला चांगले काम करत आहेत. महिलांचे नेतृत्व स्वीकारावे याबाबत उत्तर भारताची मानसिकता दिसत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Loading...
Advertisement

खासदार सुळे म्हणाल्या, मी आयुष्याला संघर्ष म्हणून बघत नाही. आपण अपेक्षा मापात ठेवल्या तर आयुष्य समाधानात जाते. सर्वसाधारण कुटुंबामध्ये असते तसेच आमचे बाप-लेकीचे नाते आहे. आम्ही प्लुटो आणि नेपच्यून नाहीत. मला हे सेलिब्रिटी वातावरण यामुळेच आवडत नाही. आम्ही एकदम नॉर्मल आहोत. फक्त कामाचे स्वरूप वेगळे आहे. पुरुष मतदान करत असतील तर मी महिला खासदार कशी असू शकेन. आमचा पक्ष छोटा आहे. राज्यसभेतील (Rajyasabha) चार खासदारांपैकी वंदना चव्हाण (Vandaja Chavhan) आणि फौजिया खान (Faujija Khan) या दोघी महिला आहेत. पण आमच्या कामाबद्दल इतर पक्षाचे खासदार कौतुक करतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply