Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Lumpy Update : ‘या’ जिल्ह्यात लम्पी स्किनचा धोका वाढला.. आता ‘इतक्या’ गावांत पोहोचला घातक आजार

Lumpy Update : नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) लम्पी स्किन (Lumpy Skin) आजाराचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. या आजाराने जिल्ह्यातील 998 जनावरे बाधित झाली असून आतापर्यंत 157 गावांत हा घातक आजार पोहोचला आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आणखी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये आता आजारी जनावरांची रक्त तपासणी (Blood Test) बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच स्टेरॉईडचा वापर पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य उपाययोजनाही सुरू आहेत तरी देखील आजार आटोक्यात येताना दिसत नाही. आजारी जनावरांवर तातडीने उपचार सुरू केल्याने 364 जनावरे आता या आजारातून बरी झाली आहेत.

Advertisement

लम्पी आजाराने बाधित असलेल्या जनावरांची रक्त तपासणी करणे बंधनकारक आहे. शेतकर्‍यांनीही तपासणी करण्यासाठी येणार्‍या पशुधन विकास अधिकार्‍यांना याबाबत आवाहन करावे. या बरोबरच उपचारासाठी आता स्टेरॉईडचा वापर पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लम्पी आजाराने बाधित जनावरांवर आता फक्त पशुधन विकास अधिकारीच उपचार करणार आहेत. पशुपालकांनीही अन्य कुणाला उपचार करू देऊ नयेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. लम्पी आजार आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण (Vaccination) मोहीम वेगात सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 5 लाखांपेक्षा जास्त जनावरांचे (Animal) लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहीम सुरू असून जनावरांचे मोफत लसीकरण (Free Vaccination) केले जात आहे.

Loading...
Advertisement

लम्पी बाधित जनावरांवरील औषधोपचार तसेच लसीकरण पूर्णपणे मोफत करण्यात येत आहे. पशुपालक शेतकर्‍यांनी यासाठी पैसे देऊ नयेत. उपचारासाठी येणार्‍या पशुधन विकास अधिकार्‍यांनाही येण्या-जाण्यासाठी पैसे देऊ नयेत, असे सांगण्यात आले. लम्पी आजाराबाबत उपचार मोफत आहेत अन्य आजारांसाठी नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

जिल्ह्यातील 157 गावांत फैलाव
जिल्ह्यात लम्पी आजार वेगाने फैलावत चालला आहे. हा आजार आता 157 गावांमध्ये पोहोचला आहे. 998 जनावरे बाधित झाली असून उपचारानंतर यातील 364 जनावरे बरी झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply