Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

AAP : राजकारणात खळबळ..! भाजप विरोधकांना झटका; अरविंद केजरीवाल यांनी घेतला ‘हा’ निर्णय

AAP : आम आदमी पार्टीने (AAP) रविवारी पहिले राष्ट्रीय लोक अधिवेशन आयोजित केले होते. त्यात देशभरातून उपस्थित पक्षाचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. या दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रणनिती तयार केली. दिल्ली आणि पंजाबनंतर गुजरातमध्ये (Gujarat) ‘आप’ सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर भाजप (BJP) विरोधात उभारल्या जाणाऱ्या आघाडीत पक्ष सामील होणार की नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

केजरीवाल म्हणाले की, सध्या भाजपला पराभूत करण्यासाठी स्थापन केलेल्या विरोधी आघाडीत सामील होण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. त्याऐवजी, केजरीवाल यांनी पक्षाच्या सदस्यांना AAP च्या ‘मेक इंडिया नंबर 1’ मोहिमेद्वारे “भारतातील 130 कोटी नागरिकांची युती” तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. गुजरातमध्ये पार्टीच्या वाढत्या लोकप्रियतेने भाजपला हादरवले असल्याचा दावा त्यांनी केला.

Loading...
Advertisement

केजरीवाल म्हणाले की, भाजप पक्ष आपल्या आमदारांना भ्रष्टाचाराच्या खोट्या प्रकरणात अडकवून ‘आप’ला दडपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवत केजरीवाल यांनी युक्तिवाद केला. याशिवाय नॅशनल पीपल्स कॉन्फरन्समध्ये आप खासदार संजय सिंह यांनी भाजपकडून देशभर चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन लोटसविरोधात (Operation Lotus) ठराव मांडला. त्याचवेळी ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गोपाल राय यांनी देशव्यापी मेक इंडिया नंबर-1 मोहीम यशस्वी करण्यासाठी संकल्प पत्र सादर केले.

Advertisement

राजकारणात खळबळ..! भाजप विरोधकांना मोठा झटका; ‘केसीआर’ यांनी घेतला ‘हा’ निर्णय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply