Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

MSME business बाबत झालीय महत्वाची घोषणा; पहा एफएम सितरामन यांनी काय म्हटलेय

MSME business

MSME business: मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खाजगी क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची (Micro, Small and Medium Enterprises / एमएसएमई) बिलच्या रकमेची थकबाकी 45 दिवसांच्या आत भरण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारचे विभाग आणि उपक्रमही एमएसएमईची थकबाकी वेळेवर देत नसल्याची कबुली त्यांनी यानिमित्ताने देण्यात आली. सीतारामन यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात याबाबत सांगितले की, केंद्र, राज्य सरकारे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमही (central, state governments and public sector enterprises) एमएसएमईचे देणेकरी आहेत. खाजगी क्षेत्र आणि उद्योगांनी 45 दिवसांच्या आत पैसे देण्याचा निर्णय घ्यावा. याबाबत रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे हिशोबाचे पुस्तक दाखल करावे.

Loading...
Advertisement

त्यांनी पुढे म्हटले की, हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार पावले उचलेल. हे सुनिश्चित करेल की त्याचे विभाग आणि PSU 90 दिवसांच्या आत सर्व लहान व्यवसायांना पैसे देतात. (ensure that its departments and PSUs pay small businesses within 90 days) ट्रेड प्लॅटफॉर्म आणि समाधान पोर्टल सारख्या योजना लहान व्यवसायांना वेळेवर पेमेंट मिळण्यास मदत (Schemes like Trades Platform and Samadhan Portal help small businesses) करतात. त्याचाही वापर वाढवा. ग्राहकांच्या चांगल्या सेवेसाठी बँकांनी (better customer service) काम केले पाहिजे, याबाबत बोलताना सीतारामन म्हणाल्या की, सर्व बँकांनी त्यांच्या प्रणाली एकमेकांशी सुसंगत असल्याची खात्री केली पाहिजे. यातून बँक ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील. इंडियन बँक्स असोसिएशनच्या (meeting of the Indian Banks’ Association) बैठकीत बोलताना अनेक वेळा ग्राहकांना वेगवेगळ्या बँकांशी व्यवहार करण्यास भाग पाडले, यावरही त्यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, ही अशी कृत्रिम भिंत आहे, जी बँकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी बांधली आहे. त्यांनी बँकांना सायबर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यास भर द्यावा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply