Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maruti WagonR on road price: लाखात घेऊन या घरी; पहा EMI आणि ऑफर्सची माहिती

Maruti WagonR on road price: फक्त 1 लाख रुपयात ही कार घेऊन येताना आपण बँकेचा मासिक हप्ता, कारसाठी लागणारा पेट्रोल खर्च आणि इतर खर्च लक्षात घेऊन कार घेण्याचे नियोजन करावे.

Maruti WagonR on road price: पुणे (Pune): सुरक्षितता आणि दणकटपणा यात भलेही मारुती कंपनीच्या कार कमी असोत. मात्र, कुठेही सर्व्हिस आणि रिसेल किंमतीला जास्त मागणी असल्याने भारतीय बाजारात कंपनीचे स्थान पक्के आहे. मध्यमवर्गीय समाजात मारुति सुजुकी वैगनआर जेडएक्सआई प्लस (Maruti Suzuki WagonR ZXI Plus) ही एक सर्वाधिक विक्री होणारी गाडी (the top selling variant) आहे. हिची किंमत 6.58 लाख रुपये असून मॅन्युअल पेट्रोल कार 23.56 kmpl इतकी दमदार मायलेज देते. मारुती सुझुकीची ही फॅमिली हॅचबॅकच्या ZXI आणि ZXI Plus प्रकारांच्या डाउन पेमेंटबद्दल तसेच त्यावर उपलब्ध कर्ज आणि इएमआई तपशीलांबद्दल (Bank loan and EMI details) यात माहिती दिलेली आहे.

Advertisement

WagonR ZXI ची एक्स-शोरूम किंमत 6.10 लाख रुपये असून ऑन-रोड किंमत 6,87,461 रुपये आहे. या मॉडेलला रुपये 1 लाख (ऑन-रोड प्लस प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचा हप्ता / on-road plus processing fee and first month EMI) डाउन पेमेंट भरून आपण ही कार घरी घेऊन येऊ शकतो. कर्जाचा व्याजदर 9% असल्यास तर तुम्हाला 5,87,461 रुपयांचे कार कर्ज मिळू शकते. ऑनलाइन कॅल्क्युलेटर (EMI calculator) नुसार 5 वर्षांसाठी दरमहा 11,195 रुपये मासिक हप्ता भरावा लागेल. मारुती WagonR ला वित्तपुरवठा मिळाल्यास तुम्हाला 5 वर्षांमध्ये व्याज म्हणून 1.44 लाख रुपये द्यावे लागतील.

Loading...
Advertisement

तर, WagonR ZXI Plus ची एक्स-शोरूम किंमत 6.58 लाख रुपये असून ऑन-रोड किंमत 7.41 लाख रुपये आहे. CarDekho EMI कॅल्क्युलेटरनुसार 6,41,031 रुपये कर्ज मिळाल्यास आणि व्याज दर 9 टक्के राहिल्यास तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी दरमहा 13,307 रुपये मासिक हप्ता लागेल. मारुती वॅगनआरच्या ZXI+ व्हेरिएंटच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या प्रकाराला वित्तपुरवठा झाल्यास 5 वर्षांमध्ये रु. 1.57 लाख व्याज लागणार आहे. त्यामुळे फक्त 1 लाख रुपयात ही कार घेऊन येताना आपण बँकेचा मासिक हप्ता, कारसाठी लागणारा पेट्रोल खर्च आणि इतर खर्च लक्षात घेऊन कार घेण्याचे नियोजन करावे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply