Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Politics : बारामतीसोबतच भाजपचे मिशन ‘तिथे’ही जोरात; केंद्रीय मंत्री यांचा तीन दिवस दौरा

Maharashtra Politics : पुणे Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala sitharaman) या तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. याचसोबत आता शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघाकडेही भाजपने लक्ष वळवले आहे. केंद्रीय मंत्री रेणुका सिंग (Renuka Singh) शिरुर लोकसभा मतदार संघात १४, १५ आणि १६ सप्टेंबर हे तीन दिवस दौरा करणार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) असले तरी या ठिकाणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adharao Patil) हे या मतदारसंघात कायम प्रतिनिधित्व करत आलेले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपची नेमकी भूमिका काय असणार याकडेही लक्ष लागले आहे.

Advertisement

या दौऱ्याचा आढावा आज भाजपचे आमदार व शिरूर मतदार संघाच्या प्रभारी माधुरी मिसाळ (Madhuri missal) यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत या दौऱ्या संदर्भात माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात निश्चितपणे भाजपाचा उमेदवार निवडणून येणार, असा विश्वास शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी व आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री रेणुका सिंग शिरुर लोकसभा मतदार संघात तीन दिवस दौरा करणार आहेत. दि.१ ४, १५ आणि १६ सप्टेंबर २०२२ असे तीन दिवस संघटनात्मक व सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत, असे आमदार मिसाळ यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

यावेळी संयोजक श्री. ॲड. धर्मेंद्रजी खांडरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे (Mahesh Landge), ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर (Yogesh tilekar),  पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, पिं. चिं.शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार मिसाळ म्हणाल्या की, शिरुर, बारामती, शिर्डी (Shirdi) अशा तीन मतदार संघाचे क्लस्टर केले असून त्याची जबाबदारी रवि अनासपुरे व सुनील कर्जतकर यांच्याकडे आहे. हडपसर (Hadapsar), आंबेगाव (Ambegaon), मंचर, जुन्नर , शिरुर आणि भोसरी विधानसभा मतदार संघनिहाय केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

केंद्रीय आदिवासी विकास मंत्री रेणुका सिंग यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात संघटनात्मक आणि सार्वजनिक असे एकूण २१ कार्यक्रम होणार आहेत. पदाधिकाऱ्यांशी संवाद, लाभार्थींची चर्चा, भाजपा परिवारातील संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद, हुतात्मे- महात्मे यांच्या स्मारकांना भेटी, वारकरी सांप्रदायातील लोकांशी संवाद, तीर्थक्षेत्र भीमाशंकर  भेट, स्थानिक नागरिकांशी संवाद, आदिवासी बांधवांशी चर्चा, शासकीय अधिकाऱ्यांशी आढावा बैठक, महामार्ग समस्या पाहणी आदी कार्यक्रम नियोजित केले आहेत. संघटनात्मक बांधणीमुळेच भाजपाने यशस्वी वाटचाल ठेवली आहे. आगामी दीड वर्षांत शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवून मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. नदी सुधार प्रकल्प, पुणे-नाशिक महामार्ग, रेड झोन, तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण भागातील राष्ट्रीय महामार्ग आदी विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार मिसाळ यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply