Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Genesh Festival: विसर्जन मिरवणुकीत कानठळ्या..! पहा कोणते विक्रम रचले मंडळांनी

Genesh Festival: पुणे (Pune) : निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण त्याचा परिणाम असा झाला की ढोलताशा आणि डीजेच्या दणदणाटामुळे कानठळ्या (Noise) बसल्या. यंदा १०५.२ डेसिबल्स इतका आवाजाचा उच्चांक  नोंदवला गेला. मर्यादेपेक्षा दुप्पटीने हा आवाज होता. ‘अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे’च्या (Students of Engineering collage pune) विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणेच यंदाही विसर्जन मिरवणुकी दरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांतील ध्वनी पातळीची मोजणी केली. त्यातून ही माहिती समोर आली. यापूर्वी २०१३ मध्ये सरासरी ध्वनी पातळी १०९.३ डेसिबल्स नोंदवण्यात आली होती. त्यानंतर गेल्या बावीस वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक सरासरी ध्वनी पातळी (Pollution) यंदा नोंदवली गेली.

Advertisement

शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून ते शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीतील आवाजाची मोजणी यात करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत ध्वनी पातळी सरासरी १०० डेसिबल्सपर्यंत होती. त्यानंतर मात्र आवाजाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. रात्री ८ ते १२ या काळात आवाजाची सरासरी पातळी ११० डेसिबल्स इतकी होती. रात्री १२ वाजेनंतर डीजेंचा दणदणाट थांबणे अपेक्षित असले तरी आवाजाची पातळी चढतीच राहिली. रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ११३.१, पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत १०७.५ आणि सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ११३.८ सरासरी ध्वनी पातळी नोंदवण्यात आली. कुंटे चौक व उंबऱ्या गणपती चौकात सर्वाधिक आवाज नोंदवण्यात आला.

Loading...
Advertisement
 • मिरवणूक मार्गावरील चौक व सरासरी ध्वनी पातळी ः
 • बेलबाग चौक – १०२.८
 • गणपती चौक – १०४.९
 • लिंबराज महाराज चौक – १०३.२
 • कुंटे चौक – ११३.१
 • उंबऱ्या गणपती चौक – ११२.६
 • गोखले चौक – १०१.६
 • शेडगे चौक – १०२.४
 • होळकर चौक – १०३.८
 • टिळक चौक – १०५.३
 • खंडूजी बाबा चौक – १०२.२

 

Advertisement
 • गेल्या आठ वर्षांतील डेसिबल
 • २०१३ – १०९.३
 • २०१४ – ९६.३
 • २०१५ – ९६.६
 • २०१६ – ९२.६
 • २०१७ – ९०.९
 • २०१८ – ९०.४
 • २०१९ – ८६.२
 • २०२० – ५९.८
 • २०२१ – ५९.८
 • २०२२ – १०५.२

Advertisement

Leave a Reply