Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Genesh Festival: विसर्जन मिरवणुकीत जमा केला ‘एवढा’ कचरा..!

Genesh Festival: पुणे : तीस तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाच्य १ हजार ३७ कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीन तासात मध्यवर्ती पुण्याचा भाग स्वच्छ केला. यामध्ये तब्बल ३२ टन कचरा गोळा केलाच. पण सहा टम्पो चपला आणि बुटही गोळा केले आहेत. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, लाल बहुदूर शास्त्र रस्ता, कर्वे रस्ता जंगली महाराज रस्ता या रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणुक जात असल्याने येथे मोठ्याप्रमात गर्दी झाली. तसेच ठिकठिकाणी खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळ शहरात मोठा कचरा जमा होणार असल्याने घनकचरा विभागाने स्वच्छतेचे नियोजन केले होते.

Loading...
Advertisement

विसर्जन मिरवणूक जशा संपतील तशी महापालिकेने स्वच्छता सुरू केली. या सर्व भागात १ हजार ३७ महापालिकेचे स्वच्छता सेवका होते. तसेच आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, कमिन्स इंडिया, स्वच्छ संस्था, जनवणी संस्था, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रोटरी क्लब, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय व इतर स्वयंसेवी संस्थांचे असे ६५० स्वयंसेवक स्वच्छता करण्यास सहभागी झाले होते. यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकी मार्ग लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक चौक, खंडुजी बाबा चौक, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता,गणेशखिंड रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे मुंबई रस्ता या मुख्य मार्गावर स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ३२ टन ८०० किलो कचरा संकलन करण्यात आला आहे. विसर्जनादरम्यान २१ टन ३२० किलो निर्माल्या, ६ टम्पो चपला बुट जमा करण्यात आले आहे. या स्वच्छतेच्या कामात कॉम्पॅक्टर ९, घंटा गाडी १३, छोटा हत्ती ३६, टेम्पो ६ टिपर ८ डीपी ८ आधार पुनावाला फाऊंडेशनच्या गाड्या २६ सहभागी झाल्या होत्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply