Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pakistan News: लंडनमधील 6.5 कोटींची कार पाकिस्तानात..! चोरांनी केली अनोखी क्राइम स्टोरी

Pakistan News: लंडन : इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमधून चोरीला गेलेली एक आलिशान कार पाकिस्तानातील कराची येथून छापेमारीत जप्त करण्यात आली आहे. ही कार ब्रिटनमधून चोरून पाकिस्तानात आणण्यात आली होती. एका छाप्यात पाकिस्तानच्या कस्टम अधिकाऱ्यांनी कराचीतील एका बंगल्यातून ‘बेंटले मुल्सेन’ (Bentley Mulsanne) सेडान ही लक्झरी कार जप्त केली. यूकेच्या नॅशनल क्राइम एजन्सीने पाकिस्तानच्या कस्टम एन्फोर्समेंटला (UK’s National Crime Agency had informed Pakistan’s Customs Enforcement) कार चोरीला गेल्याची माहिती दिली होती, त्यानंतर अधिकाऱ्यांनी कराचीतील एका बंगल्यावर छापा टाकला आणि तिथून महागडी कार जप्त केली. (A luxury car stolen from the capital London has been recovered from Karachi, Pakistan during a raid)

Advertisement

छाप्यात आणखी एका बंगल्यातून विनापरवाना शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. काही आठवड्यांपूर्वी लंडनमध्ये ही कार चोरीला गेली होती आणि टोळीतील सदस्यांनी कार चोरण्यासाठी पूर्व युरोपीय देशातील एका उच्च राजनयिकाच्या कागदपत्रांचा वापर केल्याचे सूत्रांनी सांगितले. ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने ही कार चोरीला गेल्याची माहिती दिल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बंगल्यावर छापा टाकून ‘बेंटले मुल्सेन’ कार जप्त केली. या मुत्सद्द्याला आता त्यांच्या सरकारने माघारी बोलावले असल्याचे सांगण्यात आले आहे. (diplomat in the Eastern European country to steal the car)

Loading...
Advertisement

या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार $ 3,00,000 (भारतीय चलनानुसार 2,39,24,714 रुपये आणि पाकिस्तानी चलनानुसार 6,57,90,000 रुपये) पेक्षा जास्त आहे. ही ब्रँडची सर्वात मोठी आणि महागडी सेडान आहे. याप्रकरणी बंगल्याचा मालक कागदपत्रे देऊ शकला नाही, त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला आणि कार विकणाऱ्या दलालाला अटक केली. कारची नोंदणीही बनावट असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले. कस्टम अधिकार्‍यांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, चोरीला गेलेल्या कारच्या तस्करीमुळे 30 कोटींहून अधिक रुपयांची करचोरी झाली. या संपूर्ण रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

एका रिपोर्टनुसार, ही कार बंगल्याच्या मालकाच्या व्हरांड्यात पार्क केलेली आढळली. मालकाने चौकशीत सांगितले की, ही कार त्याला दुसऱ्या व्यक्तीने विकली होती. संबंधित अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची प्रक्रिया मंजूर करून घेऊ, असे कार विकणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. पाकिस्तानच्या वृत्तपत्र बिझनेस रेकॉर्डरच्या (Pakistan’s newspaper Business Recorder) वृत्तानुसार, ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीकडून माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कराचीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली. शोधमोहीम सुरू केली असता ही आलिशान कार एका बंगल्यात उभी असलेली आढळून आली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply