Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BJP : ‘या’ भाजप नेत्याने केला मोठा दावा.. नितीश कुमार सरकारला दिले ‘हे’ मोठे आव्हान..

BJP : मणिपूरमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेडला (JDU) भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा धक्का दिला आहे. जेडीयूच्या सहापैकी पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या राजकीय घटनेवर राज्यसभा खासदार आणि बिहार भाजप ज्येष्ठ नेते सुशील मोदी (Sushil Modi) यांनी म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशपाठोपाठ आता मणिपूरही (Manipur) जेडीयूमुक्त झाले आहे. त्या सर्व आमदारांना एनडीएमध्ये (NDA) राहायचे होते, असा दावा त्यांनी केला.

Advertisement

याशिवाय सुशील मोदी असेही म्हणाले की, “लवकरच आम्ही बिहारमधील जेडीयू-आरजेडी युती तोडून राज्याला जेडीयूमुक्त करू.” नितीश कुमार यांच्यावर मोदी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, होर्डिंग्ज आणि फलक लावून कोणीही पंतप्रधान बनू शकत नाही. याआधी सुशील मोदी यांनीही नितीश कुमार यांच्यावर टीका करणारे ट्विट केले होते. यानंतर जेडीयू नेते भाजपवर अधिक जोरदार टीका करत आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह यांनी भाजप नेते सुशील कुमार मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सुशील मोदींना उद्देशून भारतीय जनता पार्टीच्या नैतिकता आणि आचरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading...
Advertisement

ते म्हणाले, की “सुशील जी, तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की अरुणाचल आणि मणिपूर या दोन्ही ठिकाणी JD(U) ने भारतीय जनता पार्टीचा पराभव करून जागा जिंकल्या. त्यामुळे जेडीयूपासून मुक्तीचे दिवास्वप्न पाहू नका. अरुणाचलमध्ये जे घडले ते तुम्ही युती धर्माचे पालन केल्यामुळे घडले. आणि मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे नैतिक आचरण सर्वांसमोर आहे. तुम्हाला आठवत असेल की 2015 मध्ये पंतप्रधानांनी 42 सभा घेतल्या, तेव्हा फक्त 53 जागा जिंकता आल्या होत्या. 2024 मध्ये देश भाषणबाजीपासून मुक्त होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply