Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pune News: नागपूरकडे लक्ष देणारे गडकरी पुण्याबाबत म्हणाले की..; विकासाबाबत..

Pune News: पुणे:  ‘‘पुणे (Pune) आणि नागपूर (Nagpur) यांच्यात कायम तुलना होत असते. या दोन्ही शहरातील स्पर्धा निकोप असली पाहिजे. मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर मध्ये विकासासाठी प्रयत्न करत आहोत पण त्याचवेळी पुण्याकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आश्वासित केले.

Advertisement

३४ व्या पुणे फेस्टिव्हलच्या (Pune Festival) उद्घाटन सोहळ्यात गडकरी बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष व माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) , खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) , गिरीश बापट (Girish Bapat) , सिने अभिनेत्री हेमामालिनी (Hemamalini) , सिने अभिनेते सुनील शेट्टी (sunil setti) , फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी आदी उपस्थित होते. यावेळी दिमाखदार सोहळ्यात ३४ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने तर ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, एन. ए. ए. सी. (नॅक)चे चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ने गौरवण्यात आले.

Loading...
Advertisement

प्रास्ताविकात कलमाडी म्हणाले, ‘‘पुणे आणि नागपूर यांच्यात एकच फरक आहे, तो म्हणजे नागपूरकडे विकासाचे डबल इंजिन आहे.’’ याचाच संदर्भ देत गडकरी यांनी पुण्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करणार नसल्याची आणि येथील रस्ते व वाहतुकीचा प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही दिली. तसेच, ‘मराठी साहित्य, संस्कृती, नाट्य, संगीत, नृत्य याला जगभरात तोड नाही. हे वैभव टिकवण्याचे काम पुणे फेस्टिव्हल करत आहे. पुणे फेस्टिव्हल हे देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान आहे’, अशा शब्दांत फेस्टिव्हलचे कौतुक केले. उदयनराजे भोसले, हेमामालिनी यांनीही मनोगत व्यक्त केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply