Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pune News: फडणवीस यांचा पवारांना झटका; अखेर पळवापळविला ब्रेकच..!

Pune News: पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर (Purandar Airport) तालुक्यात प्रस्तावित असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हे विमानतळ बारामतीच्या (Baramati Airport) दिशेने सरकवण्याचा प्रयत्न सुरू केला होता मात्र आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पवार यांचे हे मनसुबे उधळून लावले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ (Pune International Airport) हे पूर्वी ठरलेल्या जागेवरच होणार आहे. या विमानतळाच्या सर्व परवानगी जुन्या जागेवरच्याच आहेत. त्यामुळे या विमानतळाची जागा बदलली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी पुण्यात बोलताना आज स्पष्ट केले.

Advertisement

फडणवीस यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे विमानतळाच्या जागेबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत अदानी ग्रुपकडून (Adani Group) प्रस्ताव आला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. पूर्वनियोजनानुसार हे विमानतळ खेड (Khed) तालुक्यात होणार होते. परंतु तेथील स्थानिकांनी विमानतळासाठी आवश्‍यक असणारी जागा देण्यास नकार दिला. या विमानतळाला आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला. त्यामुळे सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हेच विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच प्रस्तावित विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण केलेले आहे.

Loading...
Advertisement

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच पुरंदर (Purandar)तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या विमानतळाला जमिनी देण्यास प्रथमपासून तीव्र विरोध सुरु केला होता. तेथील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तेथील जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी याही विमानतळाची जागा बदलण्याचा प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला दिला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply