Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pune News: मग मिळणार नाही बांधकाम परवानगी; पुणे मनपाने आदेश केलाय जारी

Pune News: पुणे: शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी व इलेक्ट्रिक वाहनांना (E vehicle) प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने नवे आदेश पारित केले आहेत यामध्ये नवीन बांधकाम करताना २० टक्के पार्किंग हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी आरक्षित असले पाहिजे व तेथे चार्जिंग ची सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे जर ही सुविधा केली जाणार नसेल तर बांधकाम परवानगी दिली जाणार नाही असे आदेश पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) काढले आहेत.

Advertisement

महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) “महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण २०२१ ” या योजनेअंतर्गत नवीन इमारती बांधकामासाठी (Building Permission) परवाना देताना त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची सुविधा अंतर्भूत असली पाहिजे तरच नवीन निवासी इमारतींना आणि इतर इमारतींनाही बांधकामांचे परवाने देण्यात येतील असे शासनाने सांगितले आहे. पुणे महानगरपालिकेअंतर्गत १५ जूलै २०२२ पासून नवीन इमारतींच्या बांधकामासाठी मान्यता देण्यासाठीच्या अटींमध्ये, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक लोड विद्युत महामंडळाकडून मान्य करून घेणे ही अट सुद्धा समाविष्ट करून घेतली आहे . बांधकामाच्या प्रस्तावामध्ये जर २० टक्के चारचाकी वाहनांसाठीची पार्किंगची जागा नमूद केलेली असेल तर ही सुविधा उपलब्ध करण्यात यावी. त्या २० टक्के क्षेत्रापैकी ३०% क्षेत्र हे सामाईक पार्किंगमध्ये असायला हवे.

Loading...
Advertisement

त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक, आयटी पार्क, व्यावसायिक, हाँटेल तसेच दवाखान्याच्या इमारतींसाठी जर ५० पेक्षा जास्त चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असेल तर त्यातील २५ टक्के क्षेत्र हे इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सुरू असलेल्या व्यावसायिक , हाँटेल, शिक्षणसंस्था , मल्टीप्लेक्स ,दवाखाने अशा इमारतींमध्ये जर ५०टक्के चारचाकी वाहनांची सुविधा उपलब्ध असेल तर तिथे १० टक्के अचल पार्किंग हे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी राखीव ठेवण्याचे आवाहन शासनाने केले आहे. ही सर्व माहिती प्रेस रिलिजद्वारे मिळाली असून “महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण २०२१” नुसार सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,  असे महापालिकेने आदेशात नमूद केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply