Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Weather Update: ‘त्या’ भागात पावसाचा तडाखा..! पहा क्लिक करून ताजा हवामान अंदाज

Weather Update: सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये (weather forecast received from Regional Meteorological Center, Mumbai, Solapur district) दिनांक ०३ सप्टेंबर आणि ०७ सप्टेंबर २०२२ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस ते ३४ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ७५ ते ८३ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ४८ ते ६३ % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेग ताशी १० किमी ते १५ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

ईशारा : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्‍यासाह (वार्‍याचा वेग ताशी ३० – ४० किमी ) पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर)  दिनांक ०७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. (Madhya Maharashtra (Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur)) प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषि मौसम सेवा-जिल्हा कृषि हवामान केंद्र (कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर) यांनी हा कृषी सल्ला प्रसिद्ध केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply