Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Devendra Fadnavis: पुण्याचा पालकमंत्री आणि खासदार होण्यावर फडणवीस म्हणाले की…!!!

Devendra Fadnvis : पुणे: गेले काही दिवसापासून (Pune) माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पालकमंत्री होणार या चर्चेला उधाण आले होते. यासह 2024 ला लोकसभेला (Loksabha Election) भाजपचा (Bjp) उमेदवार फडणवीसच असणार याही चर्चेने जोर पकडलेला होता. परिणामी फडणवीस पुण्याचे खासदार होणार म्हणून स्थानिक इच्छुकांच्या पोटात गोळा आला होता. मात्र आता यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत “मी पुण्याचा पालकमंत्री ही होणार नाही आणि खासदार देखील होणार नाही” असे स्पष्ट करत या चर्चेवर पडदा टाकला.

Advertisement

पुण्यात गणेशोत्सवाची (Pune Ganeshoswatv Festival) धामधूम सुरू असताना शासकीय व खासगी कार्यक्रमांसाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात आलेले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आणि खासदार होणार का याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला.

Loading...
Advertisement

फडणवीस म्हणाले, “मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही आणि खासदारदेखील होणार नाही. या केवळ माध्यमांमध्ये रंगलेल्या चर्चा आहेत. मी खासदार होऊन दिल्लीला जाण्याची वाट पाहताय का? तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मी नको का असा प्रतिप्रश्नही त्यांनी माध्यमांना केला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस म्हणाले, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. त्याचवेळी मात्र काँग्रेसमधील (Congress) नेत्यांना मंत्रिमंडळ (Cabinet) स्थान देणार का या प्रश्नावर फडणवीस यांनी मौन बाळगले. त्यामुळे नेमके काय होणार याबाबत आणखी वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply