Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra : महाविकास आघाडीला इशारा; राज्यात ‘या’ नव्या समीकरणाची होतेय तयारी; जाणून घ्या..

Maharashtra : राज्याच्या राजकारणात (Maharashtra) पुन्हा एकदा राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काँग्रेसमध्ये (Congress) सारे काही ठीक नसल्याचे समोर आले आहे. पक्षातील नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मनसे (MNS) चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यानंतर आता 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) व मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्यांकडून राज ठाकरे यांची भेट घेतली जात आहे. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप आणि मनसेकडून तसे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Corporation Election) जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी आता भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीला होईल असे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची असेल तर मनसेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे भारतीय जनता पार्टीचे नेते चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी आता राज ठाकरे यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. या भेटी सध्या सुरू असल्या तरी भाजप-मनसे युती होणार का, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. तसे अधिकृत काहीच नाही. सध्या फक्त अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, राजकारणात नेहमीच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होत असतात. तसे भाजप-मनसे युती होईल किंवा नाही हे सध्या सांगता येणे कठीणच आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडू लागल्या आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply