Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याला झटका; पहा, कशामुळे घटले सोन्याचे भाव ?

Gold Price Today : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याला जोरदार झटका बसला आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी कपात नोंदविण्यात आली. जागतिक संकेतांमुळे भारतात सोन्याचे दर घसरत आहेत. यूएस फेडरल रिजव्‍‌र्हचे (American Federal Bank) चेअरमन जेरोम पॉवेल यांनी सेंट्रल बँक आपले प्रतिबंधात्मक धोरणात्मक उपाय सुरू ठेवणार असल्याचे जोर देऊन सांगितले. त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा अंदाज आहे की, अमेरिकन बँक व्याजदर 75 बेसिक पॉईंटपर्यंत वाढवू शकतो. आज जागतिक पातळीवर शेअर बाजार (Share Market) आणि कमोडिटी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे.

Advertisement

डॉलर दिवसागणिक मजबूत होत आहे. सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) महिन्याच्या दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. 2 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,400 रुपये झाला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,620 रुपये आहे. तर चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा आजचा भाव एका किलोसाठी 52,300 रुपये इतका आहे.

Loading...
Advertisement

तसे पाहिले तर कोरोना (Corona) साथरोगाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोन्याचे असलेल्या दराच्या तुलनेत सोने अजूनही 4 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यावेळी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये प्रति तोळा असे होते. त्यानंतर मात्र दर कमी होत गेले. सध्या सोने 50 हजारांच्या आसपास आहे. असे असले तरी सोन्याला मागणी कमी झालेली नाही. सध्या सण उत्सवांचा काळ सुरू आहे. त्यामुळे सोने आणि चांदीला मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत नजीकच्या काळात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,400 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,620 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,430 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,650 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,430 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,650 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,430 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,650 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 523 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (Making Charges) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती बदलतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply