Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Petrol : पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर; पहा, तुमच्या शहरात किती रुपयांत मिळेल पेट्रोल

Petrol : तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) जाहीर केले आहेत. आजही दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 मे पासून ते स्थिर आहे. राजधानी दिल्लीत (Petrol Price In Delhi) आज पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे.

Advertisement

दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबईत 94.28 रुपये, कोलकात्यात 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता, जेव्हा अर्थमंत्र्यांनी उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याची घोषणा केली होती. 21 मे रोजी पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क कपातीची घोषणा करण्यात आली होती. या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोल 8.69 रुपयांनी तर डिझेल 7.05 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Loading...
Advertisement

तेलाच्या (Oil) किमतीत चढ-उतार दिसून येत आहेत, कारण रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) दरम्यान रशियन तेलाचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे व्यापाऱ्यांना पुरवठा कमी करावा लागला आहे. यासोबतच तेलाच्या कमकुवत मागणीमुळेही चिंता कायम आहे. युद्धानंतरच्या तीन महिन्यांत भारताने (India) रशियाकडून (Russia) 5.1 अब्ज डॉलरचे पेट्रोलियम आयात केले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते पूर्वीपेक्षा 3 पटीने जास्त आहे. सरकारने डिझेलवरील विंडफॉल प्रॉफिट टॅक्स वाढविला आहे. डिझेल निर्यातीवर सरकारने हा कर वाढवला आहे. या वाढीनंतर विंडफॉल प्रॉफिट टॅक्स 13.5 रुपये प्रति लीटर झाला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply