Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Agriculture: शेतीक्षेत्रात भारताचा डंका..! पहा कशामध्ये प्रस्थापित केलाय नवा विक्रम

Agriculture: मुंबई (Mumbai) : हरित क्रांतीमुळे (Green Revolution) भारत केवळ अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण (food grain production) झालेला नाही; तर मागील 6 दशकात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश (second largest wheat producing country in the world) बनला आहे. 1960 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीनंतर देशातील गव्हाच्या उत्पादनात सुमारे 1,000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही देशातील शेतकरी आणि नागरिकांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे. कारण, एकेकाळी अमेरिकन मिलो हा लाल गहू खायला (American Milo used to eat red wheat) लागणाऱ्या भारत देशात मुबलक प्रमाणात गहू उपलब्ध आहे. यामुळे कुपोषणावर मात करण्यात देशाला यश येण्यासाठी बळ मिळाले आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या डेटा चार्टनुसार 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला देशाचे एकूण गव्हाचे उत्पादन 98.5 लाख टन होते, जे 2021-22 मध्ये वाढून 1,068.4 लाख टन झाले. गेल्या आर्थिक वर्षात भारताने विक्रमी 7 दशलक्ष टन अन्नधान्याची निर्यात केली. कृषी उत्पादकता वाढवण्यात हरित क्रांतीने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सरकारने म्हटले आहे. यानंतर प्रति हेक्टर एकूण धान्य उत्पादनात तिपटीने वाढ झाली आहे. 1960 च्या मध्यात, प्रति हेक्टर धान्य उत्पादन 757 किलो होते, जे 2021 मध्ये वाढून 2.39 टन झाले. 2021-22 या पीक वर्षात देशात विक्रमी 315.7 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन होऊ शकते.

Loading...
Advertisement

प्रमुख कृषी उत्पादनाच्या चौथ्या अंदाजानुसार हा आकडा 2020-21 च्या कापणीच्या हंगामापेक्षा 49.8 लाख टन अधिक आहे. 2021-22 मध्ये उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) सरासरी उत्पादनापेक्षा 25 दशलक्ष टन अधिक असल्याचा अंदाज आहे. 2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन 10.68 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी 103.8 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण 29.6 लाख टन अधिक आहे. उपलब्ध एकरी क्षेत्राच्या ताज्या आकडेवारीनुसार, प्रमुख खरीप पीक असलेल्या भाताचे क्षेत्र मागील हंगामातील 343 लाख हेक्टरवरून 8 टक्क्यांनी घटले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply