Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Job Alert: मोदीराज्यात ‘त्याचा’ही विक्रम..! पहा नोकऱ्यांची काय झालीय परिस्थिती

Job Alert: मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशात आणि प्रत्येक राज्यात संबंधित मुख्यमंत्री यांनी दमदार काम केल्याचा दावा संबंधित पक्ष दररोज करतात. मात्र, त्यातील वास्तव स्थिती नकारात्मक असल्याचा फटका सामान्य जनतेला सहन करावा लागतो. आताही मोदींची लोकप्रियता जगात वाढल्याच्या आणि देश विश्वगुरू होणार असल्याच्या दाव्याच्या बातम्या झळकत असताना वास्तवात बेरोजगारी (unemployment rate is increasing) वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतीय राज्य (North Indian states) यातही आघाडीवरच आहेत.

Advertisement

केंद्र सरकारकडून अर्थव्यवस्थेला वेग आलेला असल्याचे दावे केले जात असतानाच रोजगारात वाढ होण्याऐवजी घट झालेली आहे. ऑगस्टमध्ये बेरोजगारी दर ८.२८% इतका होता. तो गेल्या एक वर्षातील सर्वाधिक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (Center for Monitoring Indian Economy (CMIE) / सीएमआयई) मॅनेजिंग डायरेक्टर महेश व्यास यांनी सांगितले की, डेटानुसार ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारी दर ८.२% वरून वाढून ९.५७% झाला, तर ग्रामीण भागांत ६.१४% वरून वाढून ७.६८% झाला. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ४० लाख जास्त लोकांनी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही.

Loading...
Advertisement

केंद्र सरकार २०२४ पर्यंत १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे म्हणत आहे. पण वास्तवात राज्य सरकारांनी गेल्या ८ वर्षांत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या युवकांपैकी ०.३% नाच नोकरी दिली आहे. एकूणच मोदीराज्यात बेरोजगारी वेगाने वाढत आहे. केंद्र सरकार यावर काहीही करताना दिसत नाही. तसेच युवकांच्या मागण्यांकडे विशेष प्राधान्याने लक्ष दिले जात नसल्याचीही भाजपवर टीका होत आहे. हरियाणा 37.3%, जम्मू-काश्मीर 32.8%, राजस्थान 31.4% आणि झारखंड 17.3% या राज्यात बेरोजगारी वेगाने वाढली आहे. (Haryana 37.3%, Jammu and Kashmir 32.8%, Rajasthan 31.4% and Jharkhand 17.3%) तर, छत्तीसगड 0.4%, मेघालय 2.0%, महाराष्ट्र 2.2%, गुजरात 2.6% या राज्यात तुलनेने बेरोजगारी कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. (Chhattisgarh 0.4%, Meghalaya 2.0%, Maharashtra 2.2%, Gujarat 2.6%)

Advertisement
Advertisement

Leave a Reply