Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BJP Mission Mumbai: शिवसेनेच्या हातातील मुंबई घेण्यासाठी ‘अशी’ आखली रणनीती; मंत्री शाहही परवा येणार

BJP Mission Mumbai: मुंबई : मागील २९ वर्षांपासून मुंबई महापालिकेत (BMC News / Mumbai Municipal Corporation) भाजपच्या (BJP) मदतीने शिवसेनेची (Shivsena) सत्ता आहे. ती काबीज करण्यासाठी यंदा महाराष्ट्र भाजप विशेष मेहनत घेत आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहांच्या (Amit Shah) मुंबई दौऱ्यानिमित्ताने मिशन मुंबईचा शुभारंभ होत असल्याचे म्हटले जात आहे. शहा ५ तारखेला मुंबईत लालबागचा राजा (Lalbhagcha Raja) व सिद्धिविनायक (Siddhivinayak) या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत.

Loading...
Advertisement

याबाबत माहिती देताना माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले की, शहांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई महापालिके’चा शुभारंभ करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी शहांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या घरगुती गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. (Mumbai Ganesh Festival) मुंबई पालिकेत २२७ नगरसेवक आहेत. या वेळी भाजपचे मिशन २०० असेल. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता असल्याने आणि त्याला शिवसेनेचा बंडखोर गट मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिलेदारांची मदत होणार आहे. त्यामुळे भाजपा यंदाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे पानिपत करण्यात यशस्वी होतो किंवा नाही याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply