Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Raj Thackeray: राज ठाकरेंना नाना पटोलेंचा सूचक इशारा; पहा काय म्हटलेय भाजप भेटीबाबत

Raj Thackeray: पुणे (Pune): मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भाजप (BJP) नेत्यांनी ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याआधी हे लोक अशाच पद्धतीने ‘मातोश्री’वर जात होते. कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो, हे आपण बघतच आलो आहोत, टीका काँग्रेसचे (Congress President Nana Patole) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आता त्यास भाजप आणि मनसे कसे प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील (Pune Ganesh Festival 2022) गणपती मंडळांना आज पटोले यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, ‘‘ प्रत्येकजण गणेशोत्सव साजरा करीत असतो. आपल्या प्रत्येकासाठी हे आनंदाचे दिवस असतात. कोरोनामुळे (Corona period) आम्ही आमचा धर्म आमची संस्कृती या सगळ्या पासून दुरु झालो होतो. मात्र, सण साजरे करताना सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या महागाईचा विचार करण्याची गरज आहे. सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे महागाई कमी करण्याची सुबुध्दी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला दे, अशी प्रार्थना मी विघ्नहर्त्या गजाननाकडे केली आहे.’’ भाजपा नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी सुरू असलेल्या भेटीबाबत बोलताना पटोले यांनी जोरदार टीका केली. (Politics on MNS and Maharashtra BJP meet at Shivtirtha)

Loading...
Advertisement

ते म्हणाले, ‘‘ हेच लोक पूर्वी दहा वेळा मातोश्रीवर जात होते. त्यामुळे कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो हे आपण बघतच आलो आहे. त्यामुळे मी यात पडणार नाही. देशात सर्वाधिक महागाई आपल्या राज्यात आहे. महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्या, इतकीच माझी मागणी आहे.’’ देशात एकप्रकारचा दहशतवाद सुरू आहे. लोकशाहीमध्ये लोकांची मत मारण्याचा अधिकार यांना मिळाला आहे का, असा प्रश्‍न पटोले यांनी केला. लोकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करून सत्तेचा माज आल्यासारखे काहीजण वागत आहेत. मात्र, यांचा माज उतरवायला वेळा आल्यावर जनता मागे पुढे बघणार नाही, अशी टीका पटोले यांनी केली. कोण कुठली महापालिका जिंकेल हे येणारा काळ सांगेल. या लोकांनी राज्याची सत्ता ज्या पद्धतीने घेतली. त्यामुळे प्रशासन देखील दहशतीमध्ये आहे. असा दहशतवाद आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहात आहोत, अशी टीका पटोले यांनी केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply