Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Electric Bike: अरे वा..! फक्त 999 रुपयांमध्ये बुक होणार ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक बाईक; जाणुन घ्या डिटेल्स

Please wait..

Electric Bike: जयपूरस्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी (electric two wheeler company) हॉप इलेक्ट्रिक (Hop Electric) आपली पहिली मोटरसायकल Hop OXO लाँच करणार आहे. ही इलेक्ट्रिक बाईक 5 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. विशेष बाब म्हणजे या इलेक्ट्रिक बाइकची रेंज 140 किमी पर्यंत असणार आहे आणि त्याचा लुक तुम्हाला यामाहा FZ ची आठवण करून देईल. तर त्याचा टॉप स्पीड 90 किमी आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही 999 रुपयांमध्ये ई-बाइकची प्री-बुकिंग करू शकता. कंपनीने नुकताच या बाईकचा नवीन टीझर व्हिडिओ देखील जारी केला आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

ही इलेक्ट्रिक बाइक कशी दिसते?
साइड टर्न इंडिकेटरसह सर्वत्र एलईडी लाइटिंग मिळते. हेडलाईट डिझाइन जुन्या 150cc Yamaha FZ सारखे दिसते. टीझर बघून खात्रीने सांगता येईल की रियर हब मोटर OXO मध्ये उपलब्ध असेल. स्प्लिट सीट आणि रीअर ग्रॅब रेल देखील दिसू शकते, जी FZ सारखीच आहे. OXO ला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागच्या बाजूला ड्युअल शॉकर्स आहेत. दोन्हीकडे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

Advertisement

बाईकमध्ये ड्युअल बॅटरी सेटअप मिळू शकतो. त्याचा टॉप स्पीड 80 ते 90 किमी/तास असू शकतो. हे फुल चार्जमध्ये 140 किमी कव्हर करते. बाईकची किंमत 1.20 लाख रुपयांपर्यंत असू शकते असे मानले जात आहे. कंपनी एक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन देखील तयार करत आहे, जिथे फक्त 20 सेकंदात बॅटरी बदलली जाऊ शकते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply