Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Mahindra Scorpio-N ची वाट पाहत आहात? तर तयार व्हा; कंपनीने केली ‘ही’ मोठी घोषणा

Please wait..

Mahindra Scorpio-N : तुम्हीही महिंद्राच्या नवीन स्कॉर्पिओ एनच्या (Mahindra Scorpio N) डिलिव्हरीची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कंपनीने या एसयूव्हीच्या (SUV) डिलिव्हरीशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. जर तुम्ही ही कार बुक केली असेल तर लवकरच तुम्ही ती घेऊन रस्त्यावर फिरणार. महिंद्राने जाहीर केले की सर्व-नवीन स्कॉर्पिओ-एन ची डिलिव्हरी 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने कंपनीने ही खास तारीख निवडली आहे. कंपनीचा दावा आहे की डिलिव्हरी सुरू झाल्यापासून पहिल्या 10 दिवसांत वाहनाच्या 7,000 हून अधिक युनिट्सची डिलिव्हरी केली जाईल.

Advertisement

Advertisement

या व्हेरियंटची पहिली डिलिव्हरी
महिंद्राच्या मते, Scorpio N च्या Z8-L व्हेरियंटच्या डिलिव्हरीला प्राधान्य दिले जाईल, कारण कंपनीने ग्राहकांना पहिल्या 25,000 बुकिंगपासून दोन महिन्यांच्या आत या प्रकाराच्या डिलिव्हरीचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, कंपनी लवकरच पहिल्या 25,000 बुकिंगसाठी डिलिव्हरी टाइमलाइन जाहीर करेल. कंपनीने हे देखील उघड केले आहे की वेगवेगळ्या व्हेरियंटसाठी प्रतीक्षा कालावधी भिन्न असेल. सध्या, पहिल्या 25,000 बुकिंगसाठी सरासरी प्रतीक्षा कालावधी केवळ चार महिन्यांचा असेल.

Advertisement
Loading...

कंपनीच्या या नवीन SUV ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ-N ला 30 जुलै रोजी बुकिंग सुरू झाल्यापासून 30 मिनिटांत 1 लाखाहून अधिक बुकिंग मिळाले होते. कंपनीने आपल्या कारची सुरुवातीची किंमत 11.99 लाख (परिचयात्मक) ठेवली आहे. त्याची थेट स्पर्धा Tata Harrier, Tata Safari, Hyundai Creta आणि Hyundai Alcazar सारख्या SUV सोबत राहिली आहे.

Advertisement

Advertisement

यात पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय मिळतात. याचे पेट्रोल इंजिन 200hp पर्यंत पॉवर आणि 380 Nm टॉर्क देते. तर डिझेल इंजिन 175hp पॉवर आणि 400Nm टॉर्क देण्यास सक्षम आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहेत. यात तीन ड्राइव्ह मोड आहेत – झिप, झॅप आणि झूम.

Advertisement
Advertisement

Leave a Reply