Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price : सोने खरेदीची संधी..! आज इतक्या रुपयांनी सोने-चांदी स्वस्त; खरेदीआधी चेक करा भाव..

Please wait..

Gold Price : सोने (Gold) आणि चांदीचे (Silver) दर शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. आज परदेशी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. याचा परिणाम मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमधील किमतींवरही झाला आहे. आज सफारा बाजारात व्यवहार सुरु झाला त्यावेळी सोन्याचा दर (Gold Price) 51 हजार 908 रुपये तोळे असा होता. त्यामुळे कालच्या तुलनेत सोने स्वस्त झाल्याने खरेदीदारांना आज खरेदीची चांगली संधी आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

IBJA वेबसाइनुसार, आज सोन्याचा दर 51 हजार 908 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर काल व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 52 हजार 094 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 186 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. आज चांदीचा दर 55 हजार 697 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर (Silvwe Price) 55 हजार 883 प्रति किलो होता. अशा प्रकारे आज चांदीचा दर 186 रुपये कमी झाला आहे.

Advertisement

तसे पाहिले तर कोरोना (Corona) साथरोगाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोन्याचे असलेल्या दराच्या तुलनेत सोने अजूनही 4 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यावेळी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये प्रति तोळा असे होते. त्यानंतर मात्र दर कमी होत गेले. सध्या सोने 51 हजारांच्या आसपास आहे. असे असले तरी सोन्याला मागणी कमी झालेली नाही. सध्या सण उत्सवांचा काळ सुरू आहे. त्यामुळे सोने आणि चांदीला मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत नजीकच्या काळात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply