Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona Update : आज देशात सापडले ‘इतके’ कोरोना बाधित; लसीकरणाचीही मिळाली माहिती; जाणून घ्या..

Corona Update : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे (Corona) 10 हजार 649 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 10677 लोक या आजारातून बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, सध्या कोरोनाचे एकूण 96 हजार 442 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 43744301 लोकांनी या व्हायरसवर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत 2,10,58,83,682 लोकांना कोरोनाची लस (Vaccine) देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement

आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य बुलेटिननुसार, आतापर्यंत 88.24 कोटी कोविड चाचण्या (Covid Test) घेण्यात आल्या आहेत. कोरोनाचा साप्ताहिक सकारात्मकता दर (Positivity Rate) 3.88 टक्के आणि दैनिक सकारात्मकता दर 3.75 टक्के आहे. पुनर्प्राप्तीचा दर (Recovery Rate) 98.59 टक्के आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या साथीच्या संदर्भात कडक इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयसस यांनी गुरुवारी सांगितले की, ‘कोरोना आपल्यामध्ये नाही असे आपल्याला म्हणता येणार नाही’. आम्हाला अजूनही स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. डब्ल्यूएचओ प्रमुखांचा इशारा अशा वेळी आला आहे जेव्हा पुन्हा एकदा कोरोनामुळे (Corona) होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. भारतामध्येच (India) कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे.

Advertisement

कोविड-19 सोबत जगायला शिकण्याचा अर्थ असा नाही की आपण कोरोना अस्तित्वात नाही असे भासवतो. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे असलेल्या सर्व साधनांचा वापर करत राहिले पाहिजे.” जगभरात चार आठवड्यांत कोविड-19-संबंधित मृत्यूंमध्ये 35 टक्के वाढ झाली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply