Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BJP : भाजपसमोर मोठे आव्हान.. ‘या’ लहान राज्यासाठी तयार केला खास प्लान; जाणून घ्या..

BJP : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) तीन दशकांपासून सुरू असलेली सत्ताबदलाची साखळी प्रत्येक वेळी तोडण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. पक्षाने आपले सरकार टिकवण्यासाठी ठोस रणनीती तयार केली आहे. पुढील महिन्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप निवडणूक टीम (Election Team) तयारी सुरू करणार आहे. मान्सूनचा वेग कमी होताच बूथ लेव्हल रणनीतीची अंमलबजावणी सुरू होईल. पक्ष पुढील महिन्यात निवडणूक प्रभारींचीही घोषणा करणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांचे गृहराज्य असल्याने पक्षासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. गेल्या तीन दशकांपासून प्रत्येक वेळी सत्ता बदलणाऱ्या हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी आपले सरकार टिकवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर (BJP) आहे. राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत.

Advertisement

Loading...
Advertisement

1985 पासून सत्ता बदलत आहे हिमाचल प्रदेशच्या राजकारणात 1985 पासून प्रत्येक निवडणुकीत सत्ता बदलली आहे. अशा स्थितीत काँग्रेसचा (Congress) आत्मविश्वास वाढला आहे, तर भाजप हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र त्यांच्या दाव्याप्रमाणे यश मिळाले नाही. याशिवाय नोव्हेंबरमध्ये झालेल्या चार पोटनिवडणुकांमध्येही भाजपला मोठा धक्का बसला होता.

Advertisement

भाजप अंतर्गत अहवाल पक्षाच्या अपेक्षेइतका चांगला नाही. अशा स्थितीत पक्षाने येत्या तीन महिन्यांसाठी आपली रणनीती राबविण्याचे काम तीव्र केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याला बूथ लेव्हलपर्यंत अॅक्टिव्ह करून घरोघरी जाऊन धडकेल. पुढील महिन्यात पक्ष निवडणूक प्रभारींचीही घोषणा करेल, त्यासोबत निवडणूक व्यवस्थापन पथकेही कार्यरत होतील. इतर राज्यातील नेतेही यात सहभागी होणार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 21 तर माकपला एक जागा मिळाली. दोन जागा अपक्षांना गेल्या. मात्र, त्याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चारही जागा जिंकण्यात यश आले होते.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply