Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

SGB: सरकारच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, मिळणार बंपर फायदा; जाणुन घ्या डिटेल्स

Please wait..

SGB : केंद्र सरकार (Central government) पुन्हा स्वस्तात सोने (Gold) खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. 2022-23 मध्ये, बाँडची दुसरी सीरिज 22 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या योजनेत तुम्ही 26 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करू शकता. ग्राहक 5,197 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने खरेदी करू शकतात. जर तुम्ही ऑनलाईन बाँड खरेदी केले तर तुम्हाला 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देखील मिळेल.म्हणजे तुम्ही फक्त 5147 रुपयांना गोल्ड बाँड खरेदी करू शकता.

Advertisement

सवलत मिळेल पण पूर्वीपेक्षा जास्त
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) म्हणण्यानुसार, गोल्ड बाँड योजनेच्या (Sovereign Gold Bond Scheme) दुसऱ्या सीरिजमध्ये तुम्ही 5,197 रुपये प्रति ग्रॅम या दराने सोने खरेदी करू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या बंद किंमतीच्या सरासरी मूल्यावर ही किंमत ठरवण्यात आली आहे. म्हणजेच 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीतील सोन्याच्या किमतीची सरासरी घेऊन किंमत निश्चित करण्यात आली आहे. कारण 20 आणि 21 ऑगस्टला बाजार बंद होता. गेल्या वेळी गोल्ड बाँडची किंमत 5,091 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली होती. यावेळी बॉण्ड्स 5,197 रुपये प्रति ग्रॅम दराने खरेदी करता येतील. म्हणजेच या वेळी रोख्यांची किंमत पूर्वीपेक्षा 106 रुपये अधिक आहे.

Advertisement

ऑनलाइन खरेदी करा, सवलत मिळवा
या योजनेत तुम्ही ऑनलाइन गोल्ड बाँड खरेदी केल्यास तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूटही मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही फक्त 5,147 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने खरेदी करू शकता. या बाँडची मुदत 8 वर्षे आहे. पण तुमची इच्छा असल्यास, तुम्ही 5 वर्षांनंतर कधीही या योजनेतून बाहेर पडू शकता.

Advertisement

Advertisement
Loading...

टेन्शन फ्री व्याज मिळत राहील
या सार्वभौम सुवर्ण रोख्याचे वैशिष्ट्य म्हणजे वार्षिक दराने 2.50 टक्के व्याज देखील उपलब्ध आहे. हे व्याज दर 6 महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा केले जाते. या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल.

Advertisement

गोल्ड बाँड का खरेदी करा
सुवर्ण रोखे खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सोने चोरीला जाण्याची चिंता नाही. याशिवाय चलनवाढ आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्यात गुंतवणूक ही चांगली संधी असू शकते.

Advertisement

Advertisement

घरून गुंतवणूक करा
सार्वभौम गोल्ड बाँड योजनेत तुम्ही एक ग्रॅम सोने खरेदी करून गुंतवणूक सुरू करू शकता. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करता येते. त्याच वेळी, अविभक्त हिंदू कुटुंबे आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा 20 किलो इतकी निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही ते बँक किंवा शेअर मार्केटमधून खरेदी करू शकता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply