Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

America : ‘त्या’ मुद्द्यावर भारतासाठी अमेरिकेने घेतली माघार; रशियानेही दिले ‘हे’ उत्तर, जाणून घ्या..

America : भारताला अमेरिकेकडून (America) देण्यात आलेल्या काही सवलतींच्या मुद्द्यावर रशियाने (Russia) अमेरिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतासाठी (India) घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकेची कमजोरी दिसून आली आहे, असे रशियाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, पाश्चिमात्य देशांकडून कठोर निर्बंधांचा सामना करणार्‍या रशियाच्या शस्त्रास्त्र निर्यात प्रकरणातील देयकांवर मोठा परिणाम होत आहे. रशियानेही या निर्बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

S400 खरेदीसाठी भारताला दिलेली निर्बंध सवलत अमेरिकेची कमजोरी दर्शवते, असे रशियन अधिकाऱ्याने म्हटले आहे. अमेरिकेमध्ये, प्रतिनिधीगृहाने दुरुस्ती मंजूर केली, ज्यामध्ये जुलैमध्ये भारताला काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत निर्बंधांमधून सूट देण्यात आली होती. रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशनचे (FSMTC) प्रमुख दिमित्री सुगाएव (Dmitriy Sugaev) म्हणाले, की “भारत आणि रशिया यांच्यातील S400 पुरवठ्याच्या कराराला अमेरिकेने रशियन शस्त्रास्त्रांवरील निर्बंधांचे उल्लंघन म्हटले आहे.” अमेरिकन बाजूने निर्णय का बदलला? मला माहित नाही, पण त्यांच्या कमकुवतपणामुळे असे होण्याची शक्यता आहे.

Advertisement

या प्रणालीबाबत तुर्कीवर निर्बंध लादण्यात आले होते. रशियन निर्यातीची देखरेख करणारे सुगाएव म्हणतात की, पाश्चात्य निर्बंध अयोग्य व्यापाराशी समतुल्य आहेत. त्याच वेळी हे ‘स्वतंत्र राष्ट्रांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या सार्वभौम अधिकारांकडे दुर्लक्ष करतात. निर्बंधांबाबत ते म्हणाले की नवीन उत्पादन आणि लॉजिस्टिक साखळी स्थापन करण्यात आली आहे. या मुद्द्यावर अद्याप अमेरिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिके नेते,  अधिकारी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply