Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Startup : रोजगार उद्योजकता विभागाचा मोठा निर्णय; राज्यात सुरू केल्या स्टार्टअप यात्रा; पहा काय होणार फायदा

Startup : राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 15 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 पर्यंत राज्यात (Maharashtra) स्टार्टअप (Startup) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या राज्यातील 134 युवकांना रुपये रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 17 ऑगस्टपासून यात्रा सुरू आहे. 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीमध्ये तालुका पातळीवर आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवकांना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement

श्रीगोंदा तालुक्यात 18 ऑगस्ट रोजी स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी कर्जत, 27 ऑगस्टला अकोले, 29 ऑगस्ट रोजी जामखेड, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, 30 ऑगस्ट रोजी पाथर्डी, श्रीरामपूर, नेवासा येथे स्टार्टअप यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तसेच 1 सप्टेंबर रोजी नगर शहरातील शासकीय तंत्रनिकेतन, जिल्हाधिकारी कार्यालय, विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट येथे तसेच शेवगाव येथेही या दिवशी स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व विद्यार्थी व नव उद्योजकांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी http://www.msins.in किंवा http://www.mahastartupyatra.in या वेबसाइटवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

Loading...
Advertisement

राज्यभरात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने एक वेगळे धोरण हाती घेतले आहे. या माध्यमातून उद्योगवाढ तसेच रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच उद्योग स्वयंरोजगाराच्या दृष्टीने नवीन संकल्पना काय आहेत, लोकांना याबाबत काय वाटते, त्यांच्याकडे काही वेगळ्या आयडीया आहेत का हे ही पाहिले जाणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply