Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold: अरे वा.. आता पुन्हा खरेदी करता येणार स्वस्त सोने; RBI ने केली ‘ही’ मोठी घोषणा

Please wait..

Gold : जर तुम्हाला सोन्यात (gold) गुंतवणूक (Investment) करायची असेल, तर तुम्ही RBI च्या गोल्ड बाँड योजनेत (Gold Bond Scheme) गुंतवणूक करू शकता. कारण या योजनेत गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. या आर्थिक वर्षातील ही दुसरी मालिका आहे. हा बाँड 22 ऑगस्ट 2022 ते 26 ऑगस्ट 2022 पर्यंत उपलब्ध असेल. या योजनेचे इतरही अनेक फायदे आहेत.

Advertisement

प्रति ग्रॅम किती रुपये?
22 ऑगस्टपासून म्हणजेच पुढील सोमवारपासून सुरू होणाऱ्या या गोल्ड बाँड योजनेत तुम्ही ग्रॅमपासूनही सोने खरेदी करू शकता. मात्र, आरबीआयने अद्याप किंमती जाहीर केल्या नाहीत. गेल्या वेळी आरबीआयने 20 जून ते 23 जून या कालावधीत सुवर्ण रोखे आणले होते. त्यावेळी सोन्याचे मूल्य प्रति ग्रॅम 5091 रुपये होते. तर, ऑनलाइन खरेदीवर 50 रुपयांची सूट देण्यात आली होती. म्हणजेच प्रति ग्रॅम सोन्याचा भाव 5041 रुपये होता.

Advertisement

Advertisement
Loading...

गोल्ड बाँड कसे खरेदी करावे?
जर तुम्हाला सार्वभौम गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमच्या बँक खात्यातूनही सहज सोने खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या डिमॅट खात्याशी बाँड लिंक केल्यास, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वीच ते बाजार दराने विकू शकाल.

Advertisement

गुंतवणूक किती वर्षांसाठी आहे?
गोल्ड बाँड गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. या बाँडची मॅच्युरिटी 8 वर्षे आहे. मात्र, तुम्ही 5 वर्षानंतरही ते विकू शकता.

Advertisement

Advertisement

तुम्हालाही व्याज मिळेल का?
या योजनेत गुंतवणूकदारांना 2.5 टक्के वार्षिक व्याजही दिले जाईल. सार्वभौम सुवर्ण बाँडमध्ये, तुम्हाला किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल. सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये दरवर्षी गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा आहे. जे वैयक्तिक आणि HUF साठी 4 किलो, ट्रस्ट आणि इतर अशा संस्थांसाठी 20 किलो आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply