Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Inflation : तूर डाळीनेही दिला झटका..! किंमती कमी करण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय..

Inflation : इंधनाच्या महागाईने देशातील आम आदमी हैराण झालेला असतानाच खाद्य पदार्थांच्या महागाईने (Inflation) यात मोठी भर टाकली आहे. पेट्रोल डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे देशांतर्गत महागाई वाढली आहे. खाद्य पदार्थांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. सध्या खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर नागरिकांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. देशात तूर डाळीचे (Toor Dal Price) वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने (Central Government) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यास आणि राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी जमा केलेल्या साठ्याची माहिती सरकारला देण्यास सांगितले आहे. इतकेच नाही तर राज्यांना सध्याच्या तूर साठ्याचा डेटा ग्राहक व्यवहार विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपडेट करावा लागणार आहे.

Advertisement

याशिवाय केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमध्ये (Buffer Stock) ठेवलेली 38 लाख टन डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या साठ्यात 3 लाख टन हरभऱ्याचाही समावेश आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, देशात तूर डाळीच्या उत्पादनात यंदा घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेचे तूर डाळीच्या भाव वाढत आहेत. कर्नाटक (Karnataka), महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. खरे तर या राज्यांमध्ये खराब हवामानामुळे खरिप पेरण्या लांबल्या आहेत. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून तूर दरात वाढ होत आहे.

Advertisement

मागील वर्षी 47 लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा केवळ 42 लाख हेक्टरवर तूर आहे. त्यामुळे तूर क्षेत्रात घट झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून तूर डाळीची किंमत 100 रुपये किलोच्या जवळपास होती. त्यानंतर मात्र डाळीच्या दरात वाढ झाली आहे. तूर डाळ आता 111 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply