Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Corona : काळजी घ्या.. कोरोना अजून थांबलेला नाही; पहा, किती नवे रुग्णांची पडली भर ?

Corona : गेल्या 24 तासांत देशात कोरोना (Corona) व्हायरस संसर्गाची 15,815 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. या दरम्यान 68 मृत्यू झाले असून 20,018 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. आता देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 1,19,264 वर पोहोचली आहे. दैनिक सकारात्मकता दर (Positivity Rate) 4.36 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी 13 ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, पुनर्प्राप्ती दर (Recovery Rate) 98.53 टक्के आहे. देशातील कोरोना व्हायरस संसर्गातून बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या 4,35,93,112 वर पोहोचली आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

कालपर्यंत देशात कोरोना विषाणूच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,23,535 होती, ती आज 4271 अंकांनी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसची अॅक्टिव्ह प्रकरणे एकूण संसर्गाच्या 0.28 टक्के आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसची अॅक्टिव्ह प्रकरणे एकूण संसर्गाच्या 0.28 टक्के आहेत. देशात या संसर्गामुळे आतापर्यंत 5,26,996 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात मार्च 2020 मध्ये कोरोना आजारामुळे पहिला मृत्यू झाला होता.

Advertisement

या घातक आजाराने मागील अडीच वर्षांपासून जगभरात थैमान घातले आहे. हा आजार अजूनही कायम आहे. मात्र आता तितकीशी भीती राहिलेली नाही. बहुतांश ठिकाणी कोरोना नियंत्रणात आहे. आणि यांमुळे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. लसीकरणामुळे (Vaccination) आजारावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. मात्र, असे असताना या काळात दुसरेही काही आजार आले आहेत. सध्या जगात अनेक देशांत मंकीपॉक्स या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. संयुक्त राष्ट्रांनी या घातक आजाराला महामारी घोषित केले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. देशातही या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार सतर्क असून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply