Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Petrol : आम आदमीला शनिवारीही मिळाला दिलासा; पेट्रोलबाबत तेल कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Petrol : कच्च्या तेलातील अस्थिरतेच्या सध्याच्या काळात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर पुन्हा एकदा स्थिर आहेत. शनिवारीही देशातील बहुतांश भागात पेट्रोल आणि डिझेल जुन्या दरानेच विकले जात आहे. दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी दरात वाढ न करण्याचा हा सलग 84 वा दिवस आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

कच्च्या तेलाची (Crude Oil) किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 100 डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. याचा अर्थ कच्च्या तेलाच्या वाढत्या दबावामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही शक्यता खरी ठरेल का हे आताच सांगता येणार नाही. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे तेल कंपन्यांचा तोटा वाढत असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाच्या (Fuel) किंमती वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे घडले तर देशातील सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील लोकांना आणखी त्रासदायक ठरणार आहे.

Advertisement

देशात आधीच पेट्रोलच्या किंमतीनी शंभरचा टप्पा पार केला आहे. काही ठिकाणी डिझेलही शंभरच्या पुढे गेले आहे. दर इतके भरमसाठ वाढल्याने देशांतर्गत महागाई वाढली आहे. खाद्य पदार्थांच्या किंमतीही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आम आदमी हैराण झालेला असताना सरकारकडून फारसे दिलासादायक निर्णय घेतले जात नाहीत. महागाई कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी ते तितकेसे परिणामकारक ठरत नसल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply