Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Congress : ‘आप’ नंतर काँग्रेसनेही पाडलाय आश्वासनांचा पाऊस; पहा, ‘या’ राज्यात काय काय मिळणार मोफत ?

Congress : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने (Congress) मोठी घोषणा केली आहे. गुजरातमध्ये (Gujarat) सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल आणि दिवसातील 10 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन पक्षाने शुक्रवारी दिले. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी शेतमालाच्या खरेदीवर बंदी घालण्यासाठी कायदा आणणार आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर आणि माजी मंत्री भरतसिंह सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली खते, बियाणे आदींवर आकारण्यात येणारा जीएसटी (GST) कमी किंवा काढून टाकण्याची योजना आखली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेसशासित राज्यातील शेतकऱ्यांना ज्या योजनांचा लाभ मिळत आहे, त्याचा लाभ गुजरातमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर येथे दिला जाईल. राज्यातील मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

Advertisement

राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा प्रतिस्पर्धी काँग्रेसने ही घोषणा काही दिवसांनंतर केली आहे जेव्हा ‘आप’ (AAP) राज्यात पकड मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यापूर्वी ‘आप’ने राज्यात आपले सरकार आल्यास दरमहा 300 युनिट वीज मोफत (Free Electricity) दिली जाईल, तसेच बेरोजगार युवकांना भत्ता दिला जाईल, अशी घोषणा केली होती. “गुजरात हे जास्त उर्जेचे राज्य आहे, असा दावा सत्ताधारी भाजप करत असतो. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशी वीज मिळत नाही,” असा दावा ठाकोर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply