Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Politics : आज लोकसभेच्या निवडणुका घेतल्या तर भाजप-शिंदे गटाला मोठा धक्का; मिळतील फक्त ‘इतक्या’ जागा

Maharashtra Politics : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर नुकतेच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सत्ता परिवर्तनानंतर शिंदे गटाच्या मदतीने 2024 मध्ये राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकहाती जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भाजप आणि शिंदे गटाला धक्का बसू शकतो.

Advertisement

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने एक सर्वेक्षण केले आहे. यानुसार आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप आणि शिंदे (Eknath Shinde Camp) गटाला मोठा धक्का बसू शकतो. महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढविल्यास शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसला (Congress) मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात हे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यावरून भाजप आणि शिंदे गटाने स्थापन केलेले सरकार राज्यातील जनतेला पसंत पडले नाही, असा अंदाज लावता येतो. सर्वेक्षणानुसार आज लोकसभेची निवडणूक (Election) झाली तर महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकसभेच्या 48 जागांपैकी यूपीएला 30 जागांचे नुकसान होताना दिसत आहे. त्याचवेळी भाजप नेतृत्वाखालील एनडीएला 18 जागा मिळू शकतात. भाजपसाठी हा मोठा झटका ठरू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्या होत्या. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 42 जागा त्यांनी जिंकल्या होत्या.

Advertisement

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सत्ताबदलानंतर शिंदे गटाचे आमदार आणि खासदार भाजपसोबत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे फक्त 6 खासदार उरले आहेत. त्यानुसार शिंदे गट आणि भाजप खासदारांचे सध्याचे संख्याबळ 36 आहे. मात्र, आज लोकसभा निवडणूक झाल्यास ही संख्या 18 जागांवर येईल. भाजप जागांमध्ये थेट 50 टक्क्यांची घट होणार आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळात ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply